शीला डावरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीला डावरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक आहेत. त्यांनी सुमारे १३ वर्षे ऑटोरिक्षा चालविली व नंतर महिला ऑटोरिक्षा चालकांसाठी एक अकादमी सुरू केली. त्या परभणी जिल्ह्यात राहतात. त्यांना भारताचा फर्स्ट लेडी पुरस्कार मिळाला आहे. १९८८ मध्ये त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. रिक्षाचालकांमध्ये पुरुषांची मक्तेदारी, सामाजिक दृष्टिकोन यामुळे त्यांना  सर्वच पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. योग्य प्रशिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मी त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या या कृतीची नोंद त्यावेळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये झाली होती.[१][२][३][४]

व्यतिगत जीवन[संपादन]

शीला यांनी १२वी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुणे शहरात ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली. सुरुवातला त्यांना खूप अडथळे आले पण त्यांना ते सामोरे गेले. सुरुवातीला ते भाड्याने ऑटोरिक्षा घेऊन चालवत असत. महिला असल्यामुळे त्यांना लोक भाड्याने ऑटोरिक्षा देत नसत. पैसे जमवून त्यांनी स्वतःची ऑटोरिक्षा खरेदी केली. शिरीष कांबळे याच्याशी ओळख झाली व त्याचा विवाह झाला. शिरिश हे ऑटोरिक्षा चालक होते. त्या दोघांनी २००१ पर्यंत वेगवेगळी ऑटोरिक्षा चालवली. नंतर त्यांनी स्वतःची ट्राव्हल कंपनी टाकली. त्यांना २ मुली झाल्या.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Unsung Hero: Shila Dawre, the First Indian Woman to Become an Auto-Driver as Early as 1988!". The Better India (इंग्रजी भाषेत). 2019-04-18 रोजी पाहिले.
  2. ^ "रिक्षा चालविण्यासाठी हवे आत्मविश्वासाचे बळ". Maharashtra Times. 2019-04-18 रोजी पाहिले.
  3. ^ "मिलिए देश की पहली महिला ऑटो ड्राइवर से, अब महिलाओं के लिए खोलना चाहती है अकॅडेमी". Jansatta (हिंदी भाषेत). 2019-04-18 रोजी पाहिले.
  4. ^ "11 Indian Women Who Were Firsts In Their Fields". indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2019-04-18 रोजी पाहिले.
  5. ^ "पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी" Check |दुवा= value (सहाय्य). http. 2019-04-18 रोजी पाहिले.[permanent dead link]