कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कृषी विभाग महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)

कृषी विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतीशी संबंधित नियम आणि कायदे आणि कायदे तयार करणे आणि प्रशासन करणारे महाराष्ट्र शासनाचे विभाग आहे. श्री. धनंजय मुंडे विद्यमान कृषी मंत्री

कृषी
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय कृषी विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ कृषी मंत्रालय
खाते

मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. धनंजय मुंडे हे सध्या कृषी कॅबिनेट मंत्री आहेत. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शेतीच्या उत्पादनवाढीची गरज १९ व्या शतकात जाणवायला लागली. सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. शेतीशी निगडीत सर्व विभागांचा त्यात समावेश करून ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने कामाला सुरुवात झाली. सन १९०७ पर्यंत कृषि व भुमी अभिलेख ही खाती एकत्रितरित्या कार्यरत होती. सन १९१५-१६ मधे तत्कालीन कृषि संचालक श्रीयुत किटींग यांनी जमिनीची धुप थांबवण्यासाठी केलेल्या प्रयोगाचे आशादायक निष्कर्ष आल्यानंतर सन १९२२ पासुन मृद संधारणाची कामे सुरू केली.

सन १९४२ मध्यें संमत झालेला जमीन सुधारणा कायदा १९४३ मध्यें अंमलात आल्यापासून जमीन सुधारणांची विविध कामे कृषि खात्यामार्फत राबविण्यांत येवू लागली. सन १९४३ मध्यें तत्कालीन सरकारने कृषि व इतर पूरक क्षेत्रातील समस्यांचा विचार करून शेतीकरता प्रथमच सर्वंकष कृषि धोरण आखले. या धोरणानुसार कृषि उत्पादनासाठी पाण्याचा सिंचन म्हणून उपयोग करण्यास सुरुवात झाली.[१][२]

कार्यालय[संपादन]

महाराष्ट्रचे कृषी विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Agriculture of Maharashtra
विद्यमान
धनंजय मुंडे

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा कृषी विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
  • बाळासाहेब देसाई
    (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी[संपादन]

राज्यमंत्र्यांची यादी[संपादन]

प्रधान सचिवांची यादी[संपादन]

अंतर्गत विभाग[संपादन]

  • कृषीविभाग
  • कृषी व पदुम विभाग
  • महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
  • राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँक
  • महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ

हे सुद्धा पहा[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".