मुरूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुरुम हे गाव बेन्नीतुरा नदीच्या काठी तालुका उमरगा , जिल्हा उस्मानाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ह्या गावास स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे. विश्वंभर हराळकर विश्वनाथ बरबडे सिद्धराम देवमानकर इत्यादी स्वा. सैनिक मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी लढले. माजी राज्य मंत्री आणि विद्यमान आमदार बसवराअ माधवरावजी पाटील या गावचे आहेत.

उमरगा तालुक्यातील एकमेव साखर कारखाना विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना या गावी आहे.


बडोदा येथे झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मुरुम गावचे आहेत.