रांकाग्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रांकाग्वा हे चिले देशातील मोठे शहर आहे. २०१२ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,२११ होती. देशाच्या मध्यभागात असलेले हे शहर काचापोआल प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे.

या भागात स्थानिक पिकुंचे लोकांची वस्ती होती. शहराची स्थापना ५ ऑक्टोबर, १७४३ रोजी चिलेच्या गव्हर्नर होजे ॲंतोनियो मान्सो दि व्हेलास्कोने केली. सुरुवातीस या शहराचे नाव व्हिया सांता क्रुझ दि त्रियाना होते.

१८१४मध्ये येथे झालेल्या रांकाग्वाच्या लढाईत स्पेनच्या सैन्याने चिलेच्या स्वातंत्रसैनिकांचा पराभव केला आणि पात्रिया वियेहा या क्रांतिकारी चळवळीचा अंत केला.

१९६२ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या शहरात खेळले गेले होते.