न्यूपोर्ट बीच (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यूपोर्ट बीच या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यूपोर्ट बीच हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ८५,२८७ होती. लॉस एंजेलस महानगरास लागून असलेले हे शहर ऑरेंज काउंटीमध्ये मोडते. येथून जवळ न्यूपोर्ट हार्बर हे बंदर आहे. येथील पुळणींवर सर्फिंग करणारे अनेक लोक असतात.