विकिपीडिया:मासिक सदर/मे २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्ठ सदर लेख
आपल्या घोड्यावर सवार असलेला युद्धमग्न अलेक्झांडर
आपल्या घोड्यावर सवार असलेला युद्धमग्न अलेक्झांडर

अलेक्झांडर द ग्रेट (जुलै २०, इ.स.पूर्व ३५६ ते जून ११, इ.स.पूर्व ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. तो अलेक्झांडर तिसरा या नावानेही ओळखला जातो. जागतिक इतिहासात तो सर्वात यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.

आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे.

प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो.

फिलिप हा अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्याची रचना पायदळ, घोडदळ, अभियांत्रिकी अशा अनेक विभागांत केली होती. अलेक्झांडरला लढाईचे शिक्षण लहानपणापासूनच उत्तमरीत्या देण्यात आले. याचबरोबर कला, शास्त्र, राज्यकारभार यांचे योग्य ज्ञानही अलेक्झांडरला असावे अशी फिलिपची इच्छा होती. यासाठी त्याने ऍरिस्टोटलची नेमणूक अलेक्झांडरचा गुरू म्हणून केली तसेच होमरच्या साहित्याची गोडी अलेक्झांडरला लावली. ऍरिस्टोटलने दिलेली इलियडची प्रत अलेक्झांडर सतत आपल्यासोबत बाळगत असे.

पुढे वाचा...