ऑर्किड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑर्किड ही एक पुष्पवनस्पती आहे.याची फुले नाजूक, अनेकविध रंगाची आणि सुगंधी असतात. जगातील पुष्पवनस्पती कुळांतील हे दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठे कूळ आहे. यात २८,००० पेक्षा अधिक वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश होतो. ही वनस्पती जगात जवळजवळ सगळीकडे आढळते. या वनस्पतीच्या २२,००० ते २६,००० जाती आहेत. ही वनस्पती बर्फाळ प्रदेश सोडून सगळ्या देशांमध्ये आढळते.या वनस्पतीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या वनस्पती दुसऱ्या झाडाच्या खोडावर वाढलेल्या आठळतात, यांना वृक्षचर वनस्पती [Epiphytic plant] असे ओळखले जाते . या वृक्षचर ऑर्किडमध्ये हवेतील बाष्प किंवा आर्द्रता शोषून घेण्यासाठी खास प्रकारची मुळे असतात . अशा मुळांमध्ये आर्द्रताशोषी ऊती(Valeman tissue) असतात.जास्त प्रमाणात गवत असणाऱ्या ठिकाणी ऑर्किड जमिनीवर येते. ऑर्किडच्या काही जाती नामशेष झाल्या आहेत.