निसर्गायण (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निसर्गायण
लेखक दिलीप कुलकर्णी
भाषा मराठी
प्रकाशन संस्था राजहंस प्रकाशन, पुणे.
प्रथमावृत्ती ऑगस्ट , इ.स. १९८६
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी
विषय पर्यावरण

निसर्गायण (पुस्तक)[संपादन]

"निसर्गायण - पर्यावरणाचा मूलगामी आणि एकात्म विचार" हे दिलीप कुलकर्णी यांनी पर्यावरण या विषयावर लिहिलेले मराठीतील पुस्तक आहे.

प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे.

पहिली आवृत्ती - ऑगस्ट १९८६

पर्यावरणाच्या समस्येचे मूळ मानवाच्या अपरिमित भोगलालसेत आहे आणि ती भोगवादी वृत्ती, जडवादी तात्त्विक भूमिकेतून निर्माण होते.
या भोगवादी वृत्तीपासून सोडवणूक करून घेण्यासाठी मूलभूत वैचारिक परिवर्तन आवश्यक आहे. हे वैचारिक परिवर्तन आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे करता येईल असे प्रतिपादन लेखकाने या पुस्तकात केले आहे.