रिनो–टाहो आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रीनो-टाहो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

रीनो-टाहो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RNOआप्रविको: KRNOएफ.ए.ए. स्थळसूचक: RNO) अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रीनो शहर आणि लेक टाहो परिसराला विमानसेवा पुरविणारा विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव हबार्ड फील्ड होते.

येथून अमेरिकेतील निवडक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिकोतील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अलेजियंट एर, साउथवेस्ट एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.