सहाय्य:द्विरुक्त प्राचले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झलक पहा एखादे पान त्याच्या वरील बाजूस या प्रकारचा त्रुटीसंदेश उत्पन्न करू शकते:

इशारा: Example हा Template:Cite web ला "date" प्राचलासाठी, एकाधिक किंमतींसमवेत हाक देत आहे.दिलेली शेवटची किंमतच वापरल्या जाईल.

ही त्रुटी तेंव्हा घडते जेंव्हा एखादे पान साच्यास हाक देते व एखाद्या प्राचलास एकाधिक वेळा किंमत दिल्या जाते, उदाहरणार्थ येथे |date=:

{{Cite web|date=2014|title=Cars|date=2016}}

यापैकी एखादी किंमत हटविल्यास हा त्रुटीसंदेश निरस्त होतो.पण, यासोबतच हेही बघावयास हवे कि यापैकी एखाद्या प्राचलास थोड्या वेगळ्या प्रकारे टाकण्यात आले आहे काय. उदाहरणार्थ:date= याऐवजीaccessdate=

हा संदेश जतन केलेल्या पानावर दिसत नाही, जेणेकरून वाचकांनापण तो दिसत नाही.पण त्या संदेशास/त्रुटीस ठिकठाक करावयास हवे.त्या पानाचे नंतरचे संपादकांना या बाबीची दखल घेणे कदाचित शक्य होणार नाही व ते पहिल्या लिखणास/किंमतीस चुकीने बदलवू शकतील. याद्वारे जतन केलेल्या पानावर कोणताच प्रभाव पडणार नाही कारण, त्या साच्यात दिलेली शेवटचीच किंमत ग्राह्य धरली व वापरली जाईल.

हे तेंव्हादेखील घडते जेंव्हा एकच किंमत चुकीने दोन वेळा टाकल्या जाते:

{{Cite web|date=2016|title=Cars|date=2016}}

अशा बाबी, पुढील गोंधळ टाळण्यासाठी, त्वरीतच ठिक ठाक करावयास हव्यात.(एखादा सांगकाम्या, त्या किंमती सारख्या असतील तर, ही समस्या सोडवू शकतो.)

एखादे रिकामे ठेवलेल्या लिखाण/प्राचलने देखील ही त्रुटी उद्भवू शकते:

{{Cite web|date=2014|title=Cars|date=}}

संपादक हे अनेकवेळा कोरे असलेले लिखाण/प्राचल याचे उदाहरण संकेत नकलवितात. म्हणून याचेवरही लक्ष ठेवा.

साच्यात अनेक अ-नामित (unnamed) प्राचले असू शकतात ज्यांना 1=, 2=, 3=, इत्यादी असे संचेतनाद्वारे आपोआप गणल्या जाते. पाईप (|) नंतर असलेल्या व बरोबर चिन्ह (=) नसलेल्या मजकूरास अ-नामित प्राचल गणल्या जाते उदाहरणार्थ |2014|. यापैकी प्रथम अ-नामित प्राचलास "1" म्हणतात व तसेच पुढेही. हा अशाप्रकारचा संकेत मग "1=" अशी त्रुटी उत्पन्न करतो:

{{Cite web|1=2014|title=Cars|2014}}

या प्रकारच्या त्रुट्या ह्या आपोआप लपविलेल्या वर्गात टाकल्या जातात. याचे नाव हे MediaWiki:Duplicate-args-category द्वारे निश्चित केल्या जाते. त्यांची यादी MediaWiki:Duplicate-args-category-desc येथील वर्णनानुसार, मागोवा घेणारे वर्ग येथे आपोआप तयार होते.

हा त्रुटी संदेश MediaWiki:Duplicate-args-warning द्वारे उत्पादित केल्या जातो. इंग्रजी विकिपीडियाने, सदरहू पानास "सहाय्य" दुवा जोडण्यासाठी, त्याच्या English (en) या आवृत्तीचे अनुकुलन केले आहे


त्रुटी शोधणे[संपादन]

  • जर आपणास तंत्रज्ञानाची बऱ्यापैकी जाण असेल तर आपण एखाद्या पानावरील द्विरुक्त प्राचलांची यादी, एक "स्क्रिप्ट" टाकून करू शकता:en:User:Frietjes/findargdups. फक्त, नोंदणीकृत सदस्यच याचा वापर करू शकतात.
  • अनेक न्याहाळकात (ब्राउझर) असलेले शोधा या प्रारूपाचा वापर बहुदा Ctrl+F (Windows) किंवा Cmd+F (Linux),त्रुटीत असणारे साच्याचे नाव किंवा प्राचलाचे नावाचे शोधास वापरल्या जाऊ शकते.
  • त्रुटी संदेश त्या एखाद्या पानातील विशिष्ट विभागात आहे काय हे बघण्यासाठी, आपण त्या पानातील त्या विशिष्ट विभागाची झलक पाहू शकता. चाचणी करण्यास, आपण एखाद्या पानाचा भाग झलक बघतांना उडवू शकता. अशा चाचण्या जतन करू नका.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


  • WPCleaner detects the duplicate arguments on analyzed pages, and is able to automatically fix some of them.
  • If you cannot locate the error, it may be in a transcluded page or template. The bottom of the preview window shows a list of transcluded pages under the heading "या झलकेमध्ये वापरलेले साचे:".