डेट्रॉईट नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेट्रॉइट नदी अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवरील छोटी नदी आहे. ४४ किमी लांबीची ही नदी सेंट क्लेर सरोवरात उगम पावून ईरी सरोवरास मिळते. या नदीच्या पश्चिमेस अमेरिकेतील डेट्रॉइट शहर तर पूर्वेस कॅनडातील विंडसर शहर आहेत.

या नदीची रुंदी ८०० मीटर ते ४.०२ किमी असून सर्वाधिक खोली १६ मीटर आहे. आपल्या ४४ किमीच्या प्रवाहात डेट्रॉइट नदी समुद्रसपाटीपासून १७५ मीटर उंचीवरून १७४ मीटर म्हणजे फक्त १ मीटर खाली येते.