हार्पर ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेल हार्पर ली (२८ एप्रिल, १९२६:मन्रोव्हिल, अलाबामा, अमेरिका - १९ फेब्रुवारी, २०१६:मन्रोव्हिल, अलाबामा) या इंग्लिश लेखिका होत्या हार्पर ली या नावाने लेखन करणाऱ्या लींच्या टु किल अ मॉकिंगबर्ड या पुस्तकाला १९६१ चे पुलित्झर पारितोषिक देण्यात आले होते. १९३० च्या दशकातील अमेरिकेतील वंशद्वेशाचे दोन छोट्या मुलांच्या दृष्टीने वर्णन करणारी ही कादंबरी अमेरिकेतील साहित्यामधील महत्त्वाचे लेखन समजले जाते.

ली यांना २००७मध्ये प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.