आफ्रिका (रोमन प्रांत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इ.स. १२५ च्या वेळचा आफ्रिका प्रांत

आफ्रिका प्रोकॉन्सुलॅरिस (लॅटिन: Provincia Africa Proconsularis प्रॉव्हिन्शिया आफ्रिका प्रोकॉन्सुलॅरिस) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. तिसऱ्या प्युनिक युद्धात कार्थेजच्या पराभवानंतर या प्रांताची स्थापना झाली. आजचे ट्युनिशिया, ईशान्य अल्जेरिया व पश्चिम लिबियाचा किनारी भाग हे प्रदेश या प्रांतात येतात.