कॅस्पिअन चिखल्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
British birds with their nests and eggs (1896) (14750023575)
कॅस्पिअन चिखल्या
Charadrius asiaticus

कॅस्पिअन चिखल्या किंवा वाळू टीटवा (इंग्लिश:Caspian sand plover) हा एक पक्षी आहे.

या पक्ष्याच्या छातीचा भाग राखी तपकिरी असते. कपाळ, चेहरा, भुवई आणि कंठ पिवळट पांढरा व पंखाखालचा भाग पिंगट तपकिरी करडा असतो.

वितरण[संपादन]

हे पक्षी भटके असतात व मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आढळतात. तसेच श्रीलंका आणि मालदिव बेटावर दिसतात.

निवासस्थाने[संपादन]

ते समुद्र किनारे, नद्या आणि दलदलीच्या ठिकाणी वास्तव्य करतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली