रंकाळा तलाव प्रदूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रंकाळ्यातील संध्यामठ परिसरात मार्च महिन्यापासून पाणी कमी होत जाते. याच ठिकाणी काठावर एप्रिल २०१७ मध्ये मोठया प्रमाणात मृत माशांचा खच आढळून आला. संध्यामठ परिसरातील रंकाळयाचा काठ अशा मृत माशांमुळे पांढरा शुभ्र होतो. हजारो मासे काठावर मरून पडतात, तसेच संध्यामठ पासून रंकाळा टॉवरपर्यंत मृत मासे पाण्यावर तरंगत असतात.[ संदर्भ हवा ]

रंकाळा हा कोल्हापूर शहराला लाभलेला सगळ्यात सुंदर असा हिरा आहे. अतिक्रमण व वाढत्या लोकसंख्येने तलावाचे पाणी प्रदूषित होत आहे आणि त्यातील जलचर, वनस्पती सुद्धा आपोआप नष्ट होत आहेत.[ संदर्भ हवा ]