उयान्वाट्टे स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उयान्वाट्टे मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
उयान्वाट्टे मैदान
मैदान माहिती
स्थान मटारा
स्थापना १८८४
आसनक्षमता १५,०००
यजमान श्रीलंका क्रिकेट
मटारा स्पोर्ट्स क्लब

यजमान संघ माहिती
मटारा स्पोर्ट्स क्लब (१९०४ - सद्य)
शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

उयान्वट्टे मैदान (सिंहला: උයන්වත්ත ක්‍රීඩාංගණය , तमिळ: உயன்வத்டா அரங்கம்) हे श्रीलंकेतील मटारा येथील एक बहुउपयोगी मैदान आहे. श्रीलंकेच्या दक्षिणी टोकावर वसलेले उयान्वट्टे मैदान, हे मटारा क्रिकेट क्लबचे होम ग्राउंड आहे. मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय 'A' सामने तसेच १९-वर्षांखालील संघांचे सामने झाले आहेत. लवकरच मैदानाचा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास होणार आहे.

इतिहास[संपादन]

मटारामधील पहिला क्रिकेट सामना कंबाइन्ड सिलोनीस क्रिकेट क्लब आणि मटारा सीसी या संघांदरम्यान २८ डिसेंबर १८८४ साली झाला. त्यावेळी मटारा क्रिकेट क्लब अस्तित्वात नव्हते आणि बेटाच्या इतर भागांत पाहुण्या संघांविरुद्ध खेळलेल्या खेळाडूंना जमा करून संघ बनवला जात असे.

मटारा क्रिकेट क्लबची स्थापना १९०४ मध्ये झाली, ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त चहा मळ्यांची लागवड करणाऱ्या युरोपियन खेळाडूंचा भरणा होता. शतकाच्या सुरुवातील खेळाडूंसाठी पॅव्हिलियन नव्हते. वार्षिक रेस मीट साठी बांधलेल्या शेडमध्ये खेळाडू बसत असत. १९६६ मध्ये त्यावेळचे मटारा स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष, एडमंड समरशेखर, ज्यांनी २१ वर्षे पदभार वाहिला, यांचा मैदानाच्या पुनर्विकासामध्ये खूप मोठा हात होता. मटारामध्ये खेळणारा सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय संघ होता १९७३ मध्ये, पाकिस्तान २३-वर्षांखालील संघ. माजी खेळाडू, प्रमोद्य विक्रमसिंगे आणि सनत जयसूर्या हे मटाराचे खळाडू होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]