मेहर चंद महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेहर चंद महाजन

मेहर चंद महाजन (२३ डिसेंबर, इ.स. १८८९:टिका नगरोटा, कांगरा जिल्हा, भारत - इ.स. १९६७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ४ जानेवारी, इ.स. १९५४ ते २२ डिसेंबर, इ.स. १९५४ या कालावधीत सरन्यायाधीश होते.

त्याआधी ते जम्मू आणि काश्मीरचे पंतप्रधान होते. महाजन हे भारत आणि पाकिस्तानमधील सीमा ठरविणाऱ्या रॅडक्लिफ कमिशनमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी होते. जम्मू काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणात त्यांचा भाग होता. त्यांनी लाहोर प्रदेशाऐवजी गुरदासपूर प्रदेश भारतात शामील करून घेण्याचा निर्णय घेतला होता.