येळनूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येळनूर हे गाव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात तेरणा नदीच्या काठी वसलेलं आहे. जेमतेम ३५०० हजार लोकवस्ती असलेले हे गाव. या गावातील शेती ही सुपीक असून रब्बी व खरीप अशा दोन हंगामात शेतीतून उत्पन्न घेतात. यात प्रमुख पिके ऊस, सोयाबीन, तूर आणि ज्वारी असून सोबतच मूग, उडीद, भातही पिकवला जातो. तेरणा नदीच्या काठी संत तुकाराम महाराज यांचे मंदिर आहे. या मंदिराच्या आजूबाजूला खूप दुर्मिळ आणि पुरातन असे शिल्प असून ते भग्नावस्थेत आढळतात. या येळनूर गावी दरवर्षी संत तुकाराम महाराज यांची यात्रा भरली जाते. ही यात्रा आधी सात दिवस चालत असे. पण कालांतराने यात बदल होत जाऊन ही यात्रा आता दोन दिवस भरते. या दोन दिवसीय यात्रेत पहिल्या दिवशी काला असतो. तर दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा फड भरविला जातो. या येळनूर गावची तुकाराम बीज आणि या यात्रेदरम्यान भरवण्यात आलेला कुस्तीचा फड हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या कुस्तीसाठी खूप दूरवरून पहीलवान कुस्ती खेळण्यासाठी येतात.