ललित चंदिगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ललित चंडीगढ या पानावरून पुनर्निर्देशित)

ललित चंडीगढ हे पंजाबच्या चंडीगढ शहरातील पंचतारांकित हॉटेल आहे. हे शिवालिक पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे. हे हॉटेल निर्माण करण्यासाठी फ्रांसच्या ले कोरबुसीर या सुप्रशिद्द वास्तु विशारदाच्या वास्तु कलात्मकतेच्या प्रेरणेने आणि शक्ति सामर्थ्याने आणि स्पर्धात्मक विचाराणे साकारलेले आहे.[१] या हॉटेलचा आस्वाद घेणाराणा येथे आधुनिक काळातील सर्व सुविधा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत समाधान देतात. हे हॉटेल व्यावसायिक प्रवाशी आणि वेळ घालविण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अतिशय योग्य ठिकाण आहे.

ठिकाण[संपादन]

हे हॉटेल भारत देशाचे पंजाब राज्यातील चंडीगढ येथील राजीव गांधी इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी पार्क मध्ये आहे.[२] या हॉटेल जवळील कांही मनोरंजक ठिकाणे म्हणजे रॉक गार्डन साधारण 7 किमी सुखाना लेक साधारण 7 किमी रोज गार्डन 10 किमी ही ठिकाणे तुमचे विश्रांतीचे दिवस (holiday) नक्कीच आनंदमय आणि संस्मरणीय करतिल यात शंका नाही. शिवाय चंडीगढ एर पोर्ट साधारण 12 किमी, चंडीगढ रेल्वे स्टेशन साधारण 8 किमी आहेत.

हॉटेल वैशिष्ठ्ये[संपादन]

या हॉटेल मधील चकचकीत बॉल रूम 7600 sq.ft.आहे. येथे स्टेट ऑफ आर्ट ऑडिओ-विजुयल आणि इंटरनेट सुविधा आहे. चालू घडामोडी आणि टेली – कोन्फ्रंसिंग सुविधा पण उपलब्ध आहेत. येथील बकेट हॉल मध्ये व्यवसाय सभा, खाजगी चर्चा, खाजगी कार्यक्रम, लग्न समारंभ, सेमिनार्स,आणि इतर कितीतरी बांबीसाठी सुविधा आहेत.[३] येथील विविध सभा हॉल मध्ये 39 ते 80 पर्यन्त प्रतींनिधी सामावतील इतकी जागा उपलब्ध आहे. आठवड्याचे 24 तास भोजन व्यवस्था, स्पा,जिम,सलोण,योगा,स्टुडिओ,पोहण्याचा तलाव या सुविधा आहेत.

रूम (खोली)[संपादन]

या हॉटेल मध्ये अतिशय आधुनिकतेने काचेच्या तावदानासह सजविलेल्या आणि आवश्यक त्या सर्व सुवीधासह 179 खोल्या आणि सूट आहेत की जेथून शिवालिक जंगल रेंजचा नजराणा आपण बसल्या जागेवरून ही नजरेत सामाऊ शकतो.[४]

हॉटेल सुविधा[संपादन]

24 तास स्वागत कक्ष, निर्गमन कक्ष, खोली सेवा,व्यवसाय केंद्र, पोहण्याचा तलाव,जिम,प्रवाशी कक्ष, वाहानतळं, हमाल, सुरक्षा रक्षक, भोजन व्यवस्था, गजर, किड्स पूल, बार, रेस्टोरंट,कॉफी हाऊस, लिफ्ट, अपंग सुविधा, ध्वनि प्रदूषण विरहित खोल्या, दारवान, स्वच्छता कक्ष, स्वीपर,चलन बदल, स्पा, योगा, मोकळ्या जागेतील खेळ, भाडोत्री वाहन, भेट वस्तु दुकान, भटक्ंती साठी जागा, LCD / projector, फोटोकोपी, नाइट क्लब,सौना, खरेदी केंद्र, स्टीम बाथ, बेबी सिटिंग, इ. सुविधा आहेत.

रूम (खोली) व रूम सुविधा[संपादन]

या हॉटेल मध्ये अतिशय आधुनिकतेने काचेच्या तावदानासह सजविलेल्या आणि आवश्यक त्या सर्व सुवीधासह ज्या 179 खोल्या आणि सूट आहेत. त्यात 6 प्रकार आहेत. त्यात लग्झरी रूम, डिलक्स किंग बेड, लग्झरी सूट, डिलक्स ट्विन बेड, प्रिमियर किंग बेड, प्रिमियर ट्विन बेड, यांचा समावेश आहे. येथून शिवालिक जंगल रेंजचा नजराणा आपण बसल्या जागेवरून ही नजरेत सामाऊ शकतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "दी ललित हॉटेल्स - अबाऊट अस".
  2. ^ "ललित सूरी हॉस्पिटॅलिटी ग्रुप अन्नोउन्सस लाँच ऑफ दी ललित चंदीगड".
  3. ^ "हॉटेल दी ललित चंदीगड फिचर्स".
  4. ^ "दी ललित चंदीगड इंटेंसिफीएस कंपेटिशन अमोन्ग दी ५-स्टार हॉटेल्स".