एरलिफ्ट (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एअरलिफ्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
एरलिफ्ट
दिग्दर्शन राजा कृष्ण मेनन
निर्मिती निखिल अडवाणी
कथा राजा कृष्ण मेनन
प्रमुख कलाकार अक्षय कुमार
निम्रत कौर
संगीत अमाल मलिक
अंकित तिवारी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २२ जानेवारी २०१६
वितरक फॉक्स स्टार स्टुडियोज
अवधी १२५ मिनिटे
निर्मिती खर्च ₹३० कोटी
एकूण उत्पन्न ₹२३२ कोटी



एरलिफ्ट हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड थरारपट आहे. १९९० साली इराकने कुवेत देशावर आक्रमण करून येथील सत्ता बळकावली. ह्यानंतरच्या तसेच आखाती युद्धकाळात भारताच्या एर इंडिया ह्या विमानवाहतूक कंपनीने कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीय वंशाच्या सुमारे १.७५ लाख लोकांची सुखरूप सुटका केली. ह्या सत्यघटनेवर एरलिफ्टचे कथानक आधारित आहे. एरलिफ्टमध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असून निम्रत कौर, इनामुलहक, अवतार गिल इत्यादींच्या सहाय्यक भूमिका आहेत.

एरलिफ्ट टीकाकारांच्या व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला व त्याला तिकिट खिडकीवर चांगला प्रतिसाद लाभला.

बाह्य दुवे[संपादन]