आउगुस्त लॅन्दमेसार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आउगुस्त लॅन्दमेसार (जर्मन: August Landmesser) ( २४ मे १९१०; मृत्यू: १७ ऑक्टोबर १९४४) हा जर्मनीमधील हाम्बुर्ग शहरातील ब्लोह्म + वोस या जहाज कारखान्यातील एक कामगार होता. १३ जून १९३६ रोजी नौसेनेच्या होर्स्ट वेसल या जहाजाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याने नाझी सलामी देण्यास नकार दिल्याबद्दल तो प्रसिद्ध आहे. या घटनेचे छायाचित्र उपलब्ध आहे. इर्मा एक्लर नावाच्या एका यहुदी महिलेशी त्याच्या संबंधांमुळे त्याने नाझी पक्षाचा रोष ओढवून घेतला होता, कारण अशा संबंधांना बेकायदेशीर ठरवण्यात आले होते. पुढे त्याला कारावास झाला व नंतर लष्कर सेवेत भरती करण्यात आले. लष्कर कारवाईच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. एक्लर हिला छळ छावणीत पाठवण्यात आले होते. तिथेच तिचा मृत्यू झाल्याचे मानले जाते.