उपचारात्मक शिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संकल्पना[संपादन]

उपराचात्मक शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याच्या क्षमता, उणीवा, सध्याचीशैक्षणिक पातळी जाणून घेऊन विद्यार्थ्याच्याकलेने शाळेमध्ये देण्यात येणारे शिक्षण... उपचारात्मक शिक्षण म्हणजे फळा व खडू व्यतिरिक्त इतर साधनांचा, पद्धतींचा वापर करून देण्यात येणारे शिक्षण... उपचारात्मक शिक्षणाची गरज कोणाला असते? बौद्धिक अक्षम, गतिमंदत्व, सौम्य मतीमंदत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षण पद्धतीचा चांगला उपयोग होतो. बौद्धिक अक्षम-:बुध्यांकसर्वसामान्य असतानाही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेने वाचन, लेखन अथवा गणनामध्ये मागे असणे. गतिमंदत्व-: ७० ते ८५ बुध्यांकअअसणारे विद्यार्थी सौम्यमतीमंदत्व-:५५ते ७०बुध्यांकअसणारे त्याचबरोबर शिक्षण घेऊ शकणारे विद्यार्थी

सुरुवात[संपादन]

उपचारात्मकशिक्षणाची सुरुवात समर्थ विद्यामंदिरमध्ये २०१४-२०१५ मध्ये सुरू करण्यात आली. त्यसाठी शाळेमध्ये ३ विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. यासाठी संस्थेच्या रेखा देसाई व मानसोपचारतज्ञडॉ.लिमयेयांचे मार्गदर्शन लाभले. उपचारात्मकशिक्षणाची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यावरून विद्यार्थ्याच्या बौद्धिक पातळीनुसार गट तयार करण्यात आले. तसेचविशेष विद्यार्थ्यांना दररोज व इतर विद्यार्थ्यांना किमान आठवड्यातून ४ वेळा उपचारात्मक शिक्षण देता येईल असे वेळापत्रक तयार करण्यात आले. मुलांच्या प्रगतीविषयाच्या नोंदी दर महिन्याला ठेवल्या जात असे. त्याचबरोबर दर ६ महिन्यांनी मुलांची चाचणी घेण्यात येत असे.

अध्यापन पद्धती-[संपादन]

  • लेखन

रांगोळीच्यासहाय्याने अक्षर लिहिणे

बिंदूजोडून अक्षर तयार करणे

चीनी मातीच्या सहाय्याने अक्षर तयार करणे

हवेत अक्षर लेखन करणे

पुस्तकातील बघून लिहिणे

चित्राच्या सहाय्याने लेखन करणे

स्वरव चिन्हांचा वापर करून शब्द लिहिणे

  • वाचन

फ्लश कार्डच्या सहाय्याने

संवेदानाद्वारे

चित्रांद्वारे

वेगवेगळ्या खेळाच्या सहाय्याने

स्वर व चिन्हांच्या सहाय्याने

  • गणन

वस्तूच्यासहाय्याने

वेगवेगळ्या खेळाच्या सहाय्याने

शाब्दिक गणित सोडवणे

अक्षरी गणिते तोंडी सांगणे