दुगारवाडी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुगारवाडी धबधबा
Dugarwadi.jpg
धबधब्याचे नाव दुगारवाडी धबधबा
धबधब्याची उंची
स्थळ नाशिक, महाराष्ट्र, भारत
नदीचे नाव वागची उपनदी



दुगारवाडी, नाशिक, महाराष्ट्र, भारत
दुगारवाडी धबधबा वर पर्यटक
दुगारवाडी प्राकृतिक सौंदर्य, नाशिक, महाराष्ट्र, भारत
दुगारवाडी धबधबा

दुगारवाडी धबधबा[संपादन]

त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावर दुगारवाडी गावाजवळ असलेला धबधबा आहे. [१]दुगारवाडी धबधबा परिसरापर्यंत पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी जावे लागते. निवासासाठी त्र्यंबकेश्वर हे जवळचे मोठे ठिकाण आहे.[२] हे स्थान प्रेक्षणीय आहे तसेच धोकादायकही आहे. अनेक दुर्घटना येथे घडल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. येथे मद्यपान करून गोंधळ घालणारी तरुण पिढीही पाहायला मिळते.[३] [४]

अंतर[संपादन]

  • मुंबई ते नाशिक १७१ किमी.
  • नाशिक ते त्र्यंबकेश्वर ३० किमी
  • आणि त्र्यंबकेश्वरपासून जव्हार रस्त्यावर २ किमी अंतर.

वाहन व्यवस्था[संपादन]

मुंबईहून नाशिकला येण्यासाठी बस, रेल्वे, टॅक्सीसेवा उपलब्ध आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वर परिसरात जाण्यासाठी खासगी वाहनांसह बसचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र दुगारवाडी परिसरात जाण्यासाठी स्वतचे वाहन असेल तर उत्तम. पुण्याहून येण्यासाठी बस, शिवाय पुणे-मनमाड एक्स्प्रेस ही रेल्वे, तसेच पुण्याहून कल्याण किंवा इगतपुरीला उतरून बस, टॅक्सीने त्र्यंबकेश्वपर्यंत जाता येते.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.loksatta.com/trekit-news/waterfall-in-dugarwadi-211847/lite/
  2. ^ http://www.lokprabha.com/20110701/cover05.htm#
  3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/Became-death-trap-waterfall-dugaravadi/articleshow/48090004.cms
  4. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/articleshow/15465652.cms
  5. ^ http://www.lokprabha.com/20110701/cover05.htm#