साँग्स, स्टोरीज अँड लाईव्हज (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साँग्स, स्टोरिज अंड लाईव्हज: जेंडरड डायलॉग अंड कल्चरल क्रिटिक[१] हे ग्लोरिया गुडविन रहेजा यांनी संपादित केलेले पुस्तक आहे. ते अनुवंशशास्त्रज्ञ आहेत व अनुवंशशास्त्रीय इतिहासावर त्यांचे विस्तृत काम आहे. दक्षिण आशियाई समूहातील स्त्रियांच्या मौखिक परंपरा आणि अकादमिक क्षेत्रामध्ये दुर्लक्षित राहिलेले स्त्रियांचे भिन्न आवाज यांवर हे पुस्तक भाष्य करते. सांस्कृतिक चिकित्सा करत अनुवंशशास्त्राच्या माध्यमातून लेखिका स्त्रियांच्या अनुभवांचे आकलन करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये करत आहे.

स्त्रियांच्या आवाजातील विरोधाभास[संपादन]

हे पुस्तक म्हणेज सात शोधनिबंधांचे संकलन आहे, जिथे त्या स्त्रियांच्या मौखिक परंपरांच्या मुद्द्यांबद्दलची विस्तृत सैद्धांतिक चर्चा खुल्या करतात. या शोधनिबंधांपैकी एका शोधनिबंधामध्ये नारायण, व्यक्तिगत अनुभवांवर प्रकाश टाकतात कारण मौखिक परंपरा या प्रत्येक स्त्रीच्या जगण्यात भिन्न पद्धतीने राहिलेल्या असतात. दुसऱ्या शोधनिबंधामध्ये लॅम्बन, नारायण यांच्या या दृष्टीकोनाला पाठींबा देतात, परंतु ते हे सुद्धा स्पष्ट करतात कि, मौखिक परंपरा या दैनंदिन व्यवहारातील वर्चस्वशाली प्रतिरूपणांना आव्हान देतात.

फ़्लुएकिगर त्यांच्या शोधनिबंधामध्ये चर्चा करतात कि, एकेकाळी स्त्रियांचे आवाज सार्वजनिक ठिकाणी अधिकृत स्थानांवर दिसतात आणि तरीही ते, एकप्रकारे लिंगभावाच्या सीमारेषांनी झाकून गेलेले आहेत. गोल्ड त्यांच्या शोधनिबंधामध्ये अनेक स्पष्ट बोलणाऱ्या स्त्रियांच्या आवाजांचे वर्णन करतात. रहेजा त्यांच्या शोधनिबंधामध्ये एक स्त्री विभिन्न आवाजांमध्ये बोलते यासंदर्भात मांडणी करतात. हे आवाज बहुविध व बदलते आहेत. त्यांच्या मते, स्त्रिया ह्या पितृसत्ताक एकतेला टिका करून त्यांच्या क्षमतेचा वापर करून वेगवेगळ्या तडजोडी करून प्रत्येक परिस्थितीमध्ये विविध डावपेच आखतात. मार्च हे सार्वजनिक अवकाशातील स्त्रियांच्या तडजोडी/जुळवून घेण्याबद्दल इथे बोलतात. तर रामानुजम यांच्या शोधनिबंधातील आवाज, स्त्रियांची भाषणे ही केवळ कर्तेपणाचा दावा करत नाहीत तर हे आवाज लैंगिकतेबद्दल बोलतात.

महत्त्वाचे मुद्दे[संपादन]

रहेजा यांच्या मते, एका बाजूला सत्ता व स्थान आणि दुसऱ्या बाजूला संस्कृती व समूह या मध्यवर्ती सैद्धांतिक द्वैतात ज्ञानशाखा अडकून पडलेली आहे. अनुवंशशास्त्राच्या चौकटीमध्ये संस्कृती व समूह यांतील गुंतागुंतीचे व द्वैताचा सामना करताना, स्त्रियांचे जे आवाज आहेत, ते आवाज, द्वैत चांगल्या पद्धतीने जाणून घेण्याकरिता अनुवंशशास्त्र ही पद्धती/ पद्ध्तीशास्त्र पाठींबा देतात. त्या वारंवार क्षेत्रभेट करण्यासाठी पाठींबा देतात . तसेच त्या संशोधक व संशोधन या दोहोंतील सत्तेच्या पद्धती शास्त्राच्या स्थानांची चर्चा करतात.

रहेजा यांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यावर आकाद्मिक क्षेत्रात केवळ शास्त्रीय ग्रंथाच्या संकलनालाच महत्त्व होते. परंतु, नंतरच्या काळात 'क्षेत्र' संकलनामध्ये स्थलांतर झाले. वासाहतिक, वसाह्त्तोतर व लोककथांच्या अभ्यासकांनी जे काही साहित्य संकलित केले होते ते आधुनिक भाषेत गोळा केले आणि त्यामध्येही भाषांतरित साहित्यावर भर देण्यात आला. भारतामध्ये ब्रिटिशांनी माहितीचे एकत्रीकरण करून हे दाखवण्याचा प्रयत्न केला कि, भारतीय हे वर्षानुवर्षे अविचाराने या परंपरा जपत आलेले आहेत.

लेखिकेच्या म्हणण्यानुसार, सबाल्टर्न लोकांनी सामाजिक सुधारणांकरिता उठाव केलेले असले तरी, स्त्रियांच्या आवाजांचे एकजिनसीकरण झालेले दिसते. तसेच स्त्रियांमधील जी अंतर्गत उतरंड आहे या उतरंडीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. लेखिका म्हणतात कि, दक्षिण आशियाई स्त्रिया या परंपरांच्या बाबत निष्क्रिय व शांत आहेत अशा पद्धतीने नेहमी त्यांच्याकडे बघितले गेलेले आहे. परंतु या स्त्रिया त्यांच्या रोजच्या जगण्यातून या परंपरांचा नेटाने सामना करत आहेत हे लक्षात घेतले गेलेले नाही. त्या असा दावा करतात कि, स्त्रियांचे मौखिक आविष्कार हे एकात्म किंवा एकजिनसी नाहीत. त्यांचे आवाज बहुतांश व्यक्तिगत वेळप्रसंगी आव्हानात्मक/ उपरोधक वाटणारे, कधी-कधी दुय्यमपणाचे आणि त्याचसोबत व्यापणारे/ आच्छादित करणारे आहेत.

या पुस्तकामध्ये रहेजा चर्चा करतात कि, स्त्रियांचे हे आवाज विरोधाभासीही आहेत. दक्षिण आशियाई स्त्रीचे स्थान हे जात, वर्ग, गोतावळा, समूह, वय, धर्म, व्यक्तिगत परिस्थिती याने निश्चित होत असते आणि ही स्थाने बहुविध आणि बदलणारीसुद्धा असतात. यांच्या पल्याड जाऊन या बहुविधतेला आणि स्थानांतरणाला समजून घेण्याची व या बहुविध संरचना परस्परांना कशा व्यापतात हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाच्या जीवनातील विविध स्थानांमुळे, मौखिक परंपरा या कशा परिवर्तनीय वा त्यांचे अर्थ कसे बदलत जातात, याबद्दल रहेजा बोलतात. त्या मांडणी करतात कि, मौखिक परंपरा या समूह जाणीवेला आव्हान, चिकित्सा आणि निर्माण करते. मौखिक परंपरा या सामाजिक संरचना पुनरुत्पादित करणे व चिकित्सा करणे आणि दमन करते या मधले काहीतरी असे घडवत असतात. वास्तविक मौखिक परंपरा या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब नाहीत तर त्याची घडण व पुर्नघडण करते.. स्त्रियांच्या मौखिक परंपरा या चिकित्सात्मक दृष्टीकोन उभा करत असल्या तरी, पुरुषांच्या एकात्मतेला विरोध करण्याकरिता स्त्रियांची एकात्मता, ज्यामध्ये स्त्रियांच्या आवाजांचे एकजिनसीकरण केले जाईल ती आवश्यक ठरेलच असे नाही.

योगदान[संपादन]

द एव्हरीडे: एकस्पिरीयन्सेस, कॉन्सेप्ट्स अंड नरेटिव्ह्ज या पुस्तकाच्या निमित्ताने या पुस्तकाचा युक्तिवाद उभा राहिलेला दिसतो[२]. इन द गॉडेस ॲज रोल मॉडेल: सीता अंड राधा या प्रकरणामध्ये हिंदू पौराणिक कथांतून सीता व राधा ही नैतिकतेची परिमाणे ठरवत प्रत्येकी हिंदू स्त्रीवर ती लादण्यात आली.[३]

अनअर्थिंग जेंडर: फोक साँग्स ऑफ नार्थ इंडिया या प्रकरणामध्ये लोकगीतांची चिकित्सा करत, ही लोकगीते शेतात राबताना, विवाहावेळी, प्रवासादरम्यान इ. प्रसंगी गायली जातात व मुख्यत्वे ही उत्तर प्रदेशातील खालच्या जातीतील स्त्रिया गातात अशी मांडणी केलेली आहे.[४]

द लाईव्ह्ली टेक्स्ट, एव्हरीडे लाईफ इन साऊथ एशिया या प्रकरणामध्ये लिंगभाव, जात, धर्म, जागतिकीकरण, राष्ट्रवाद या कशा परस्परसंबंधित संकल्पना आहेत व दक्षिण आशियावर त्यांचा काय परिणाम झाला आहे याची मांडणी केलेली आहे.[५]

सन्दर्भ सुची[संपादन]