श्रीनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीनगर
भारतामधील शहर

श्रीनगर येथील जगप्रसिद्ध दाल सरोवर
श्रीनगर is located in जम्मू आणि काश्मीर
श्रीनगर
श्रीनगर
श्रीनगरचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान

गुणक: 34°5′24″N 74°48′0″E / 34.09000°N 74.80000°E / 34.09000; 74.80000

देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
जिल्हा श्रीनगर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ५,२०० फूट (१,६०० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ११,८०,५७०
  - महानगर १२,७३,३१२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


श्रीनगर ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची उन्हाळी राजधानी व राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. श्रीनगर शहर काश्मीर खोऱ्यात झेलम नदीच्या काठावर वसले असून ते जम्मूच्या २५० किमी उत्तरेस व दिल्लीच्या सुमारे ८०० किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली श्रीनगरची लोकसंख्या सुमारे १२ लाख होती. श्रीनगर ऐतिहासिक काळापासून येथील रम्य हवामान, अनेक सरोवरे इत्यादींसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ राहिले आहे.

काश्मीर संस्थानाचे मुख्यालय राहिलेले श्रीनगर भारताच्या फाळणीनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले. पाकिस्तानच्या आगळिकीला घाबरलेल्या राजा हरी सिंगने २६ ऑक्टोबर १९४७ रोजी आपला तटस्थपणा संपुष्टात आणून काश्मीर संस्थानाला भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला व श्रीनगर भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग बनले. परंतु १९९० नंतर येथे सातत्याने फुटीरवादी व दहशतवादी संघटना कार्यरत आहेत ज्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था कमकूवत बनली आहे. २०१६ साली बुरहान वाणी नावाच्या लोकप्रिय फुटीरवादी नेत्याची भारतीय लष्कराने हत्या केली ज्यामुळे काश्मीर खोऱ्यात असंतोषाची प्रचंड लाट उसळली ती आजवर कायम आहे. त्यामुळे श्रीनगर येथील पर्यटन व्यवसाय बंद पडला आहे.

दरवर्षी मे ते ऑक्टोबर ह्या उन्हाळी महिन्यांदरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे सर्व कामकाज श्रीनगरमधून चालते व उर्वरित काळाकरिता राज्याची राजधानी जम्मूमध्ये असते. श्रीनगर रस्ते व हवाई मार्गांद्वारे उर्वरित भारतासोबत जोडले गेले आहे. श्रीनगर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या बारामुल्ला-बनिहाल ह्या ११९ किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर स्थित असून येथून सध्या केवळ डेमू प्रकारच्या गाड्या धावतात. ह्या मार्गावरील पीर पंजाल रेल्वे बोगदा हा भारताम्धील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा आहे. जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर श्रीनगरहून जम्मूमार्गे उर्वरित भारतापर्यंत रेल्वेसेवा शक्य होईल. राष्ट्रीय महामार्ग १ ए श्रीनगरला दिल्लीसोबत व कारगिल तसेच लेहसोबत जोडतो. श्रीनगर विमानतळ शहराच्या १२ किमी दक्षिणेस स्थित असून येथून देशाच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.

राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, श्रीनगर ही एन.आय.टी.पैकी एक असलेली तंत्रज्ञान शिक्षणसंस्था तसेच काश्मीर विद्यापीठ येथील प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत