जाम्नी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जाम्नी नदी ही बेटवा नदीची उपनदी आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातल्या बेहरोल गावाजवळ तिचा उगम आहे. टिकमगड जिल्ह्यातील सिमरा गावाजवळ तिचा बेटवाशी संगम होतो. सजनाम व शाहजाद या जाम्नीच्या उपनद्या आहेत. सजनाम नदी उत्तर प्रदेशातील गोना गावाजवळ उगम पावते.