शेंदूरजना बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विठ्ठल रुख्मिणी मुर्ती

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा येथून ३ कि.मी. अंतरावर शेंदूरजना बाजार हे गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. हे गाव सूर्यगंगा नदीच्या तीरावर वसले असून तेथे श्री संत अच्युत महाराज यांचा आश्रम आहे. या गावी गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या भारत सेवक समाजाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या शाखांपैकी एक शाखा होती. येथे शिवाजीराव पटवर्धन यांच्या कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या तपोवन या संस्थेची शाखा होती.

गुणक: 21°03′33″N 78°03′14″E / 21.059291°N 78.053892°E / 21.059291; 78.053892