चर्चा:मांडवी नदी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे जिल्ह्यात मांडवी आणि सरस्वती या नद्या आहेत ही माहिती अगदी नवीन आहे. एक तर पुणे जिल्हा या लेखात या नदीचा उल्लेख आहे.शिवाय ओतूर गावातून वहाते आणि तीच्यावरील बंढार्‍याचे स्प्ष्ट उल्लेख आंतरजालावर उपलब्ध आहेत. आणि हा लेख मुळच्या ओतूर गावातील व्यक्ती सोबत बसून लिहिला असल्या मुळे नदीचे नाव बरोबार आहे. हि बहूधा कुकडी नदीची उपनदी असावी पण निश्चित संदर्भ न मिळाल्यामुळे तसा लेखात उल्लेख केलेला नाही.

गोव्यातील मांडवी नदी असल्याची कल्पना आहे पण तीचे इंग्रजी स्पेलिंग मांडोवी असे आहे तर मुळ कोकणी नाव मांडोवी आहे का मांडवीच आहे , जर ते मांडवीचा असेल तर नि:संदिग्धीकरण करून नाव बदललेले बरे असेल हे खरे माहितगार १९:४१, १७ जुलै २०११ (UTC)


पोर्तुगीज स्पेलिंगे[संपादन]

गोव्यात पोर्तुगालचे राज्य असल्याने त्यांनी साहजिकच गोव्यातील गावा-नद्यांची नावे पोर्तुगीज लिपीत जशी होऊ शकतात तशी केली. कुट्टाळी चे Cortalim, दाभोळीचे Dabolim, गोयेचे Goa, मडगावचे मारगांव, पेडणेचे पेर्नेम. पणजीचे पंजिम वगैरे. तसेच मांडवी नदीला त्यांनी मांडोवी केली. मराठी विकिपीडियावर लिहिताना मांडवीला गोव्यातले हिंदू कोंकणी काय म्हणतात, किंवा ख्रिश्चन कोंकणी काय म्हणतात, आणि पोर्तुगीज काय म्हणत होते याचा विचार करायचे अजिबात कारण नाही. मांडवी नदीचे नाव मराठी प्रमाण भाषेत जसे लिहितात तसेच ते लिहायला पाहिजे.

काल(१७-७-२०११) इंदूरजवळच्या "पातालपानी" नामक धबधब्यात चारपाच मुले वाहून गेली. या धबधब्याचे नाव एकूणएक नराठी वर्तमानपत्रांनी, दूरदर्शन वाहिन्यांनी आणि आकाशवाणीच्या मराठी केंद्रांनी पाताळपाणी असल्याचे म्हटले आहे. इंग्रजी वर्तमानपत्रांनी पॅटल्पॅनि असे छापले आहे. या धबधब्यावर जर विकिपीडियावर लेख लिहिले तर त्यांची नावे भाषापरत्वे पाताळपाणी, पातालपानी आणि पॅटल्पॅनि अशी असतील.--J ०६:५३, १८ जुलै २०११ (UTC)


गोव्यामधल्या विख्यात मांडवी नदीशी घोटाळा होऊ नये म्हणून हे लेखनाव बदलायला पाहिजे. गोव्यात अनेक नद्या असल्या तर मोठ्या नद्या दोनच आहेत. मांडवी आणि जुवारी. या दोनही नद्या समुद्राला स्वतंत्रपणे मिळतात. त्यांतल्या जुवारी नदीच्या मुखावर गोव्यातले प्रख्यात मार्मागोवा(मोर्मुगाव) हे बंदर आहे....J १९:३०, १७ जुलै २०११ (UTC)


मांडव्या[संपादन]

आणखीहा काही मांडव्या आहेत. तामिळनाडूमध्ये पूर्व किनार्‍यावर एक मांडवी नावाचे गांव आणि नदी आहे. दशरथाचा पुत्र भरत याच्या बायकोचे नाव मांडवी होते. ही विदेह देशाच्या कुशध्वज नावाच्या राजाची मुलगी होती. कच्छमध्ये मांडवी नावाचे एक मोठे बंदर आहे. या शेवटच्या दोन मांडव्या गोव्यातील मांडवीइतक्याच प्रसिद्ध आहेत मुंबई, भरुच आणि सुरत या गावांतही मांडवी नावाची उपनगरे आहेत. त्यांतली मुंबईतली मांडवी आणि सुरतेची मांडवी प्रसिद्ध आहेत. खरे सांगायचे तर, जिथेजिथे कच्छी व्यापारी गेले तिथेतिथे त्यांना मांडवी नावाचे गाव बसवले. आफ्रिकेतही एक मांडवी आहे असे ऐकून आहे....J १०:११, १८ जुलै २०११ (UTC)