चर्चा:आंबिवली

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखाचा ’आंबिवली’ हा मथळा बदलवून ’आंबीवली’ असा केला, हे कितपत योग्य आहे याबद्दल शंका आहे. महाराष्ट्रात कांदिवली(कान्‌-दिव्‌-ली), डोंबिवली(डोम्‌-बिव्‌-ली), बोरीवली(बोरी-वली) अशा प्रकारे ’वली’ असलेली अनेक गावे आहेत. ज्या गावांच्या नावांत ’व’ आधी दीर्घ इकाराचे अक्षर येते त्या गावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये ’व्ही’नंतर ’ए’ येतो, अन्यथा नाही! त्यामुळे Dombivli, Kandivli परंतु BorivAli. इंग्रजांनी मराठी नावांची स्पेलिंगे करताना पुरेशी काळजी घेतली होती, असे माझे मत आहे. आंबिवली(आम्‌-बिव्‌-ली ?) चे स्पेलिंग Ambivli असे आहे, त्यामुळे मराठी लिखाणातला ’बि’ बहुधा ऱ्हस्व असावा. ....J (चर्चा) १२:३०, १५ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]