चर्चा:अतिउष्णतेद्वारे उदरपोकळीत रसायनोपचार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रसायनोपचार?[संपादन]

अतिउष्णतेद्वारे उदरपोकळीत रसायनोपचार ही उपचार पध्दती रसायणोपचारच्या एका प्रकार पैकी आहे हे चुक आहे. यामध्ये मुख्यतः Hyperthermia therapy आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Intraperitoneal_hyperthermic_chemoperfusion

http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1276636/

http://en.wikipedia.org/wiki/Hyperthermic_Intraperitoneal_Chemotherapy

त्यामुळे 'प्रमुख आणि पर्यायी उपचारपद्धती' या साच्यातुन रसायनोपचारच्या या पानाकडील निर्देशनास बदलावे.

Dr.sachin23 १५:२४, २ मे २०११ (UTC)


हे चुक आहे ?[संपादन]

आपण म्हणता की "रसायणोपचारच्या एका प्रकार पैकी आहे हे चुक आहे." परंतु हीपद्धती रसायणोपचारच आहे, भारतातील अशातर्हेची शस्त्रक्रिया करणारे बहुतेक एकमेव शल्य चिकित्सक डॉक्टर सेथना ह्यचे कडून ह्या लेखाचे समीक्षण केल्यावरच सदर लेख प्रसिद्ध केला आहे. (माझे कडे त्याचाशी झालेला इपत्र संवाद उपलब्ध आहे ). डॉक्टर सेथना हे सायन वैद्यकीय महाविद्यालयात स्नातकोत्तर कर्करोगाचे प्राध्यापक आहेत. भारतात येण्या पूर्वी ते डॉक्टर शुगरब्रेकर, प्राध्यापक व कर्करोग विभाग प्रमुख, हार्वड मेडीकल स्कूल, अमेरिका याचे समवेत कार्यरत होते. त्यांनी अनेक वर्षे जपान मध्ये हीं कर्करोगावर काम केले आहे. आपण दिलेले बहुतेक दुवे हे विकिपीडिया वरचे आहेत. आपणास हवे असल्यास ह्या विषयावरील अद्यावत शोधनिबंध देतायेतील.

जरी 'अतिउष्णतेद्वारे' असे नामसाम्य असले तरी जेव्हा आपण उपचार पद्धतीच्या खोलात जाऊन सखोल अभ्यास करतो तेव्हा असे निदर्शनास येते कि ह्या पद्धतीत उष्णतेचा वापर केल्यामुळे त्यास "अतिउष्णतेद्वारे" संबोधण्यात आले असावे. "अतिउष्णतेद्वारे चिकित्सा" पद्धतीत प्रामुख्याने उष्णतेचा पवार करून उपचार केल्या जातो तर "अतिउष्णतेद्वारे उदरपोकळीत रसायनोपचार" पद्धतीमध्ये उष्णतेचा वापर हा उपचारासाठी नसून रसायनिक प्रक्रिया घडवण्यासाठी केल्या जातो. त्यामुळे ह्या उपचार पद्धतीला रसायनोपचार म्हणणे जास्त समर्पक आहे.


http://www.cancer.gov/cancertopics/factsheet/Therapy/hyperthermia

राहुल देशमुख १८:२३, २ मे २०११ (UTC)

दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता ??????????[संपादन]

या लेखावरील दूरध्वनी क्रमांक हे, हे एक जाहिरात असल्याचा भास निर्माण करतात. --आभिजीत २२:३३, ११ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]