सदाशिवगड (कराड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सदाशिवगड(कराड)
नाव सदाशिवगड(कराड)
उंची ३०५० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव कराड,ओगलेवाडी,हजारमाची
डोंगररांग सुर्ली घाट
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


किल्ले सदाशिवगडचा डोंगर सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडपासून ६ कि.मी.वर आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ३०५० फूट आहे. पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी (हजारमाची) या गावातून या डोंगरावर जाता येते. संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून सुमारे १००० पायऱ्या आहेत.


सदाशिवगडचा डोंगर अफझल खानाच्या वधानंतर (१० नोव्हेम्बर १६५९ ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. कऱ्हाडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस-विटा कडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सदाशिवगड बांधून काढला.

सध्या गडावर महादेवाचे प्रशस्त मंदिर आहे,तिथे भाविकांचा नेहमी राबता असतो.समोर एक आड(चौकोनी विहीर) असून त्यात १२ महिने पाणी असते. शेजारीच मारुतीचे छोटेसे देऊळ आहे. बाकी गडावर किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत; काही ठिकाणी केवळ जोतीच शिल्लक आहेत.

{लेखक :- ओंकार रामराव गुजर, राजेंद्रकुमार विश्वनाथ गायकवाड} सदशिव गडाखाली घेऱ्या मध्ये जिथे जिथे वस्ती आहे ते भाग हजार माची, बाबर माची, राजमाची आणि वनवास माची (गडमाची) या नावांनी ओळखले जातात. या प्रत्येक वस्तीतून गडावर येण्यासाठी पायवाटा आहेत. यातील हजार माची पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने थेट पायऱ्यांपर्यंत जाता येते. पायऱ्यांच्या मार्गाने गड माथ्यावर पोहचल्यावर डाव्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली एक विहीर आहे, तिला चिंच विहिर या नावाने ओळखतात. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या विहिरीला बारमाही पाणी असते. विहीर पाहून गडावरील मंदिराच्या दिशेने निघाल्यावर एक कोरडा तलाव दिसतो. या तलावा जवळ नक्षत्र उद्यान बनवलेल आहे. तलावाच्या पुढे महादेवाचे (सदाशिवाचे) मंदिर आहे. मंदिराच्या समोर एक मोठी विहीर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते. विहिरीच्या बाजूला कड्या लगत हनुमानाचे मंदिर आहे. महादेवाचे दर्शन घेउन विहीरीच्या पुढे थोडे अंतर चालत गेल्यावर एक उद्यान आहे. हे उद्यान उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत किल्ल्याच्या झेंडा लावलेल्या ईशान्य टोकाकडे चालत जावे. उद्यानाच्या पुढे एक कोरडा पडलेला मोठा तलाव आहे. तो पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या ईशान्य टोकाच्या अलिकडे डाव्या बाजूला दोन पाण्याची टाकी आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कड्याला लागून ३ टाकी आहेत. या ठिकाणी टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. या व्यतिरिक्त गडावर इतर अवशेष नाहीत.संपूर्ण गड फिरण्यास अर्धा तास लागतो. अलीकडच्या काळात गडाच्या वायव्येकडील भागात विहीर खणन्यासाठी झालेल्या उत्खनन कार्यात एक शिवलिंग सापडले आहे,आणि ते त्या विहीरीच्या आतमध्ये भिंतीलगत पुनःस्थापित करण्यात आलेले आहे. गडाच्या पूर्वेकडे थोड्या अंतरावर आपण लहान उंचीची,मध्यम आकाराचे दगड रचून बांधण्यात आलेली तटबंदीपण पाहू शकतो.


=

बाहय दुवे =[संपादन]