बिर्ला तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था, पिलानी - गोवा प्रावार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिट्स-गोवा या पानावरून पुनर्निर्देशित)

बिर्ला तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था, पिलानी - गोवा प्रावार (इंग्रजी - Birla Institute of Technology and Science, Pilani- Goa Campus) हे झुआरीनगर, गोवा, भारत येथे स्थित खाजगी तंत्रशिक्षण विद्यापीठ आहे. ही संस्था खाजगी अर्थसाहाय्यावर चालते. हे एक पूर्णतः निवासी प्रावार आहे.

भारतातील वाढती तंत्रशिक्षणाची मागणी लक्षात घेऊन स्व. डॉ. कृष्ण कुमार बिर्ला यांनी या संस्थेची २००४ या वर्षी स्थापना केली.

हे प्रावार गोव्यातील झुआरी (अघनाशिनी) या नदीकाठी वसले आहे. संस्थेचे औपचारिक उद्-घाटन भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते झाले. या प्रावाराचे नुकतेच बिर्ला तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्था, पिलानी - के.के.बिर्ला गोवा प्रावार (इंग्रजी - Birla Institute of Technology and Science, Pilani- K.K.Birla Goa Campus) असे पुनर्नामकरण संस्थापक डॉ. कृष्ण कुमार बिर्ला यांच्या सन्मानार्थ करण्यात आले.

विद्यार्थी जीवन[संपादन]

  • वेव्ह्स - राष्ट्रीय स्तराचा सांस्कृतिक महोत्सव[१]
  • क्वार्क - राष्ट्रीय स्तराचा तांत्रिक महोत्सव[२]
  • स्प्री - राष्ट्रीय स्तराचा क्रीडा महोत्सव[३]

चित्रदालन[संपादन]

  1. ^ Nov 6, Shashank Saurav | TNN | Updated:; 2011; Ist, 04:15. "Rock bands, fashion show light up 'Waves 2011' | Goa News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-05-22 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ Jan 29, TNN |; 2009; Ist, 04:20. "Kalam to attend BITS Pilani's tech fest | Goa News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-05-22 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ "SPREE 2009- Sports Festival of BITS-Pilani, Goa Campus". PRLog. 2020-05-22 रोजी पाहिले.