सान ब्रुनो (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सान ब्रुनो, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
सान ब्रुनोमधील एक दृश्य. मागे सान फ्रांसिस्को महानगर दिसत आहे.

सान ब्रुनो कॅलिफोर्नियाच्या सान फ्रांसिस्को महानगराच्या दक्षिणेस असलेले सान मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. महानगराचाच भाग गणल्या जाणाऱ्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४१,११४ होती. इ.स. १९१४मध्ये स्थापन झालेले हे शहर सांता क्रुझ पर्वतांच्या पायथ्याशी सान फ्रांसिस्को बेच्या तीरावर आहे. सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अगदी जवळ आहे.

येथे यूट्यूबचे मुख्यालय आहे.