Jump to content

चरेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चरेगाव नावाचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे.उम्ब्रज पासून चिपळूणला जाताना,उम्ब्रज पासून पाच किमी अंतरावर हे गॉंव आहे.गावाची लोकसंख्या मोठी आहे.चरेगाव पंचक्रोशीत भोळेवाडी,खालकरवाडी,भवानवाडी,माजगाव,कलंत्रवाडी ही छोटी गावे येतात. गावात प्रामुख्याने ऊस हळद आणि ज्वारी या पिकाची लागवड केली जाते सोबत इतर पिकांचीपण लागवड केली जाते. चरेगावात प्रामुख्यानं सुर्यवंशी. माने. पवार आडनावाची घराणी आहेत दर शनिवारी सकाळी सात ते अकरा वाजता आठवडी बाजार भरतो येथील शेळ्यांचा बाजार मोठा असतो या गावची यात्रा चैत्र पोर्णिमेच्या नंतर चौथ्या आणी पाचव्या दिवशी असते . गाव पंचक्रोशीत नावाजलेले आणि राजकारणात समाजकारणात अग्रेसर आहे येथे श्री ज्योतिबा मंदिर. हनुमान मंदिर. काळेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. गावात प्रामुख्यानं सर्व हिंदु सन साजरे केले जातात विशेष करून शिवजयंती आणी गणेशोत्सव मोठा असतो. गावाचा विस्तार हा पाच ते सात किलोमीटर अंतरावर पसरलेला असून गावाजवळून उत्तर मांड नदी वाहते गावाच्या पूर्वेस NH4 . पश्चिमेस पाटण तालुक्याची शिव. दक्षिणेस चंद्रगीरी नावाचा डोंगर आणी उत्तरेस सुखाईदेवीचा डोंगर आहे .