विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१३०५२८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्लादिमिर व्लादिमिरोविच नाबोकोव्ह (रशियन: Влади́мир Влади́мирович Набо́ков, २२ एप्रिल, इ.स. १८८९ - २ जुलै, इ.स. १९७७) (साचा:IPA-ru) हा एक रशियन-अमेरिकन कादंबरीकार होता. आपल्या पहिल्या ९ कादंबऱ्या रशियन भाषेत लिहिल्यानंतर त्याने इंग्रजीमध्ये लिखाणास सुरुवात केली. १९५५ साली प्रकाशित झालेली लोलिता कादंबरी ही नाबोकोव्हची सर्वात प्रसिद्ध साहित्यकृती आहे.’मॉंडर्न लायब्ररी’त उल्लेख केलेल्या १०० सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये लोलिता ही चौथ्या क्रमांकावर, पेल फायर ५३व्या आणि नाबोकोव्हची आत्मकथा स्पीक, मेमरी ही आठव्या क्रमांकावर आहे. लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये, वर्णनाचे बारकावे आणि शैलीदारपणा ही नाबोकोव्हच्या कामाची सर्वोत्तम खासियत होती.

कादंबऱ्या लिहिण्याबरोबरच नाबोकोव्हला फुलपाखरांचा अभ्यास करण्याची आणि बुद्धिबळाचे डावपेच लिहिण्याची देखील आवड होती.

नाबोकोव्हचा जन्म रशियन साम्राज्यातील जुन्या उमराव कुटुंबात झाला होता. त्याचे वडील कॉन्स्टिट्यूशनल डेमॉक्रॅटिक पक्षाचे (केडेट पक्षाचे) नेते होते. १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीनंतर नाबोकोव्ह कुटुंबीयांनी क्रिमेआला पलायन केले. १९१९ मध्ये त्यांनी पश्चिम युरोपमध्ये आश्रय घेतला.

(पुढे वाचा...)