"योगासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎योगशास्त्र: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९८: ओळ ९८:
# [http://www.santosha.com/asanas/ अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)]
# [http://www.santosha.com/asanas/ अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)]
* [https://www.webaai.com/ योगासने आणि व्यायाम]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.webaai.com/|title=Hindi Webaai - Makes You Healthy {{!}} Yoga,Meditation,Health|last=webaai|first=Hindi|website=Hindi Webaai - Makes You Healthy {{!}} Yoga,Meditation,Health|language=en-US|access-date=2018-07-13}}</ref> - [[हिंदी भाषा|(हिंदी]])
* [https://www.webaai.com/ योगासने आणि व्यायाम]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.webaai.com/|title=Hindi Webaai - Makes You Healthy {{!}} Yoga,Meditation,Health|last=webaai|first=Hindi|website=Hindi Webaai - Makes You Healthy {{!}} Yoga,Meditation,Health|language=en-US|access-date=2018-07-13}}</ref> - [[हिंदी भाषा|(हिंदी]])
*[http://yogatips.in/?p=577 http://yogatips.in/?p=577सहज 10 ते 15 मिनिटात करता येणारी योगासने Daily Yaga Benefits in Marathi]
{{अष्टांगयोग}}
{{अष्टांगयोग}}
{{साचा:उपचारपद्धती}}
{{साचा:उपचारपद्धती}}

१९:४९, २ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. माणसाच्य पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला पीळ देणे आणि पुढे किंवा मागे झुकणे. पुढे दिलेल्या योगासनांच्या नियमित सराव केल्याने पाठीच्या वर दिलेल्या हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात.कोणत्याही प्रकाराचे आजार होत नाही.

यातली काही योगासने कुठेही आणि कधीही करता येतात. पाठदुखीवरचा तो हमखास उपाय आहे..


प्राचीन भारतीय चिकित्सापद्धतीतील योगासने ही अष्टांगयोगातील तिसरी पायरी होय.

योगासन करताना कालजीपूर्वक करा.

योगशास्त्र

इंद्रियांचे आरोग्य टिकवण्यामध्ये मनाचे महत्त्वाचे योगदान असते. आणि दोघांवर नियंत्रण ठेवणारा वायू असतो. याचे पाच उपप्रकार असतात. त्यांना पंचप्राण म्हंटले जाते. पंचप्राणांचे काम वेवस्थित चालावे यासाठी प्राणायाम योगाभ्यासाचा उत्तम उपयोग होत असतो. अग्नीच्या अधिपत्याखाली चालणारे संप्रेरकांचे कामही योगाच्या मदतीने सुरळीत चालते असे दिसते. म्हणूनचं नुसता व्यायाम करण्यापेक्षा किंव्हा जिममध्ये जाण्यापेक्षा योगासने,प्राणायाम, दीर्घश्वसन वगैरे योगशास्त्रातील क्रिया करण्याच्या अनेक पटींनी उपयोग होतो. शरीर व मनाशी संबंधित बहुतेक सर्व महत्त्वाची कामे या पंचप्राणांकरवी होत असतात. हे पंचप्राण कोणते व त्याच्यावर कोणत्या जबाबदाऱ्याअसतात हे आपण सुरवातीला पाहू या. यांनी खूप फायदे असतात.

१.प्राण

संपूर्ण अस्तित्वात भरून राहिलेली चैतन्य संकल्पना (प्रोग्राम) एका विशिष्ट मर्यादेत वैयक्तिक जीवनासाठी उपलब्धता व स्वीकारण्याची व आत ओढण्याची क्षमता. प्राणवायूचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे श्वास आत घेणे. जीवन श्वासनाद्वारे चैतन्य ठेवतो व प्रकर्षाने चैतन्यशक्तीला श्वासाबरोबर आत ओढतो. हृदय,इंद्रिये,बुद्धी,मन याना कार्यरत ठेवण्याचे व त्यांचे स्वास्थ कायम ठेवण्याचे कार्य प्राणवायूचे आहे खाल्लेल्या अन्नाचा स्वीकार करणे व ते पोटापर्यंत पोचवणे हेही काम प्राणवायू करत असतो.

२.अपान

प्राणशक्तीची बहिर्मुखता व बाहेर टाकण्याची संकल्पना.मलविसर्जन,मूत्रप्रवृत्ती,शुक्रस्खलन,स्त्रीमध्ये राजोस्त्राव व गर्भाला बाहेर काढणे य सर्व क्रिया अपान वायूच्या आधीन असतात.

३.व्यान

वस्तूचे विघटन करून त्यातील शक्ती मोकळी व रूपांतरित करणे शरीरातील पचन क्रिया,रक्ताभिसरण, विविध अवयवांचे आकुंचन-प्रसरण,पापण्यांची उघडझाप,चालणे,पळणे वगैरे विविध हाचाली व्यानवायूच्या आधिपत्याखाली येतात. अन्नपाचनांतर सारहाग व मलभाग एकमेकांपासून निराळे करणे हेही व्यनामुळेच होत असते.

४.समान

शक्तीचे समानवायू जठराग्नीला फुलवण्याचे त्याला प्रज्वलित करण्याचे काम करत असतो तसेच जठराग्नी जेथे राहतो त्या भागाला अन्नाचा स्वीकार करणे जठराग्नीकरवी अन्नाचे पचन झाल्यानंतरच पुढे जाण्यासाठी सोडणे या पचनासाठीच्या तिन्ही अत्यावश्यक क्रिया समानकरवी होत असतात.

५.उदान

शक्तीचे उस्थान. उदानाच्या साहाय्याने श्वास बाहेर सोडण्याची क्रिया होऊ शकते. तसेच बोलणे,गाणे या क्रिया उदानामुळे होत असतात उत्साह,शरीराचे बल,वर्ण या गोष्टीही उदानाच्या आधीन असतात. या पंचप्राणांचे काम व्यवस्थित चालावे यासाठी प्राणायाम योगाभ्यासाचा उत्तम उपयोग होत असतो. नुसता व्यायाम करण्यापेक्षा किंव्हा जिममध्ये जाण्यापेक्षा योगासने,प्राणायाम, दीर्घश्वसन वगैरे योगशास्त्रातील क्रिया करण्याचा अनेक पटींनी उपयोग होतो. जोपर्यंत वायू म्हणजे प्राण शरीरात आहे तोपर्यंत जीवन आहे आणि प्राणाचे सोडून जाणे म्हणजे मृत्यू. या प्राणावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंव्हा प्राणाचा शरीराशी असणारा अनुबंध अधिकाधिक टिकवण्यासाठी योग- प्राणयामासारखा उत्तम मार्ग नाही. यामुळे प्राणशक्ती अधिक चांगल्या प्रकारे आकर्षित होऊ शकते. मेंदू,हृदय,फुफ्फुसे,शरीरातील मर्मस्थाने वगैरे महत्त्वाच्या ठिकाणी परांचे संचरण नीट होऊ शकते की एकंदर उत्साह,चैतन्य जाणीव वाढायलाही मदत मिळते. संप्रेकांचे कामही यथाव्यवस्थित होऊ लागते मनाची एकाग्रता वाढते, स्मृती सुधारते,मृदुभाष्य, सौजन्यभाव विकसित होतो आसपासच्या लोकबरोबरचे संबंध सुधारण्यास मदत मिळते. संतुलन क्रियायोगापेकी काही महत्त्वाच्या क्रिया आपण पाहू या.


समर्पण

समर्पण क्रियेच्या नियमित अभ्यासाला पाठीचा कणा लवचिक होतो मानेला व्यायाम होतो,पचनक्रिया सुधारते, वायू सहजपणे सरायला मदत होते,संपर्णाची भावना निर्माण होते. ही क्रिया जास्तीत जास्त सात वेळ करावी. १. वज्रसनात बसावे. हात 'नमस्ते'च्या स्थितीत जोडून,छातीजवळ ठेवावेत व श्वास पूर्णपणे आत घ्यावा. २. हात जोडलेल्या स्थितीत ठेवून शरीरासमोर सरळ करावेत या वेळी अंगठे बाकीच्या बोटांशी कटकोनाच्या असावेत तर अंगठे आकाशाच्या दिशेला व बाकी बोटे जमिनीला समांतर असावीत. ३. करंगळीचे टोक गुडघ्याला टेकेपर्यंत हॅट खाली आणावेत. ४. थोडेसे पुढे वाकून बोटांची टोके जमिनीला टेकवावीत या वेळी पाठीचा कणा सरळ असावा. ५. नजर हाताच्या अंगठ्याच्या टोकावर ठेवावी व श्वास हळूहळू बाहेर सोडत बोटांची पॉट व छाती मांड्याच्या टेकेलेली असावी. ६. श्वास पूर्णपणे बाहेर सोडून थोडेसे फाकवुन डोके जमिनीला टेकवावे. या वेळी श्वास पूर्णपणे बाहेर सोडलेला असावा व हॅट असावेत या वेळी नितंब टांचाना टेकलेले राहील यावर लक्ष ठेवावे. ७. दोन्ही तळवे पुन्हा एकमेकांना जोडून नजर अंगठ्याच्या टोकावर ठेवून व श्वास हळूहळू आत घेवून हॅट जमिनीलगत ठेवून शरिराकडे सरकवत सरळ व्हावे. ८. ताठ बसून हॅट छातीसमोर 'नमस्ते' च्या स्थितीत आणून श्वास पूर्ण बाहेर सोडावा.श्वास आत घेऊन पुढचे आवर्तन सुरु करावे. ९. एक एक करून दोन्ही पाय सोडवून पूर्वस्थितीला यावे. सूचना- ही क्रिया वज्रसनात बसून करता येणे शक्य नसल्यास सुखासनात बसून करावी.

मानवता

या क्रियेच्या अभ्यासाने वृत्ती स्थिर होते व मनुष्यात असलेली पषत्ववृत्ती कमी होते हिच्या अभ्यासाने पाठीचा कान ताणला जातो व पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूचा ताण कमी होतो. १. भिंतीच्या समोर सरळ हातच्या अंतरावर उभे राहावे हात शरीरालागत दोन्ही बाजूला सरळ असावेत. २. दोन्ही हात वर उचलून शरीराशी काटकोनात आणावेत व बोटांच्या टोकांनी भिंतीला स्पर्श करावा या वेळी पतीचा कणा ताठ व जमिनीशी काटकोनात असावा. ३. हात एकमेकांना समांतर ठेवून थोडेशे पुढे झुकून हाताच्या तळव्यांनी भिंतीत दाबावे दृष्टी दोन्ही हातांच्या मध्ये असावी ४. उजवा पाय घुडग्यात दुमडून टाच नितंबाकडे आणावी. ५. श्वास नाकाद्वारे झटक्यात बाहेर सोडत असतानाच उजवा पाय जोरात आज झटकावा (या वेळी पायाचा जमिनीला स्पर्श होऊ नये.) ६. उजवा पाय जमिनीवर ठेवावा. ७. नंतर हीच क्रिया डाव्या पायाने करावी.


अनुलोम-विलोम

अनुलोम विलोम हा एका प्राणायामाचा प्रकार आहे, यालाच लोम-विलोम नाडीशोधन किंव्हा नडीशुद्धी प्राणायाम असेही म्हंटले जाते. यात प्रथम उजव्या नाकपुडीतून श्वास आत घेतला जातो व डाव्या नाकपुडीतून सोडला जातो नंतर डाव्या नाकपुडीतून श्वास आत घेतला जातो व उजव्या नाकपुडीतून सोडला जातो. यात शेअर्स आत धरूनही ठेवला जातो.अनुलोम-विलोमच्या नियमित अभ्यासाने श्वासन्मार्गाची शुद्धी होते नैसर्गिकपणे डाव्या व उजव्या बाजूने चालणाऱ्या श्वासोच्छसाचे नियमन होते हृदयाचे ठोके नियमित पडायला मदत होते तसेच अन्न व प्राणाचे शोषण चांगल्या प्रकारे होते. याच्या अभ्यासाने प्रणामाच्या अभ्यासाची पूर्वतयारी आपोआपच होते.



मुद्रा

नमस्ते किंवा नमस्कार मुद्रा -

  • हातातील तळवे छातीसमोर आणा. तळवे एकत्र थोडे दाबा.
  • आपल्या बोटांनी वरच्या दिशेने जावे आणि अंगठा छातीला स्पर्श केला पाहिजे.
  • कंबर पासून थोडे वाकणे आणि त्याच वेळी मान किंचित खाली वाकणे.
  • आणि नंतर "नमस्ते" म्हणा. ना-मा-स्टे.[१]

शून्य मुद्रा -

  • मधल्या बोटाच्या टोकाला अंगठाच्या पायथ्याशी स्पर्श करा.
  • थंब च्या सह हळूवारपणे प्रथम phalanges संयुक्त दाबा.[२]
  • इतर तीन बोटांनी सरळ ठेवा.
  • हा मुद्रा[३] धरा आणि वरच्या दिशेने तोंड करून आपल्या गुडघ्यावर हात ठेवा.
  • आता आपले डोळे बंद करा, श्वास घ्या आणि ध्यान[४] सुरू करा.

योगासनांवर लिहिलेली काही मराठी पुस्तके

  • आधुनिक योगशास्त्र (दा.वि. जोगळेकर)
  • ज्येष्ठांसाठी योगासने (निवृत्त विंग कमांडर नरेंद्र जोशी)
  • दमा हटाव योग चिकित्सा (बाजीराव वि. पाटील)
  • निरामय जीवनासाठी योगसाधना (दीपक बिचे)
  • मुलांसाठी योगासने (लेले गुरुजी)
  • योगासनामृत (बाजीराव वि. पाटील)
  • शालेय मुलामुलींसाठी योगाभ्यास आणि सूर्यनमस्कार (आनंद भागवत)
  • सुलभ योगासने (क्षीरसागर आणि कंपनी)


हेही पहा

बाह्य दुवे

  1. योगाबद्दल माहिती व अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)
  2. अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)
अष्टांग योग
यमनियमआसनप्राणायामप्रत्याहारधारणासमाधी



  1. ^ Angeles, Location: Los; CA; USA. "Namaste Namaskar Mudra - Meaning, How to do, 6 Benefits". 2019-11-19 रोजी पाहिले.
  2. ^ Mumbai, Location:; Maharashtra; India. "Shunya Mudra - How To Do and 6 Benefits | Yoga Mudra". 2019-11-19 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
  3. ^ "मुद्रा". 2019-11-19 रोजी पाहिले.
  4. ^ "ध्यान". 2019-11-19 रोजी पाहिले.
  5. ^ webaai, Hindi. "Hindi Webaai - Makes You Healthy | Yoga,Meditation,Health". Hindi Webaai - Makes You Healthy | Yoga,Meditation,Health (इंग्रजी भाषेत). 2018-07-13 रोजी पाहिले.