सॉफोक्लीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सॉफोक्लीस
Σοφοκλῆς
जन्म अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६
अथेन्स, ग्रीस
मृत्यू अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५
अथेन्स
पेशा नाटक लेखक

सॉफोक्लीस (ग्रीक: Σοφοκλῆς; अंदाजे इ.स.पू. ४९७/४९६ - अंदाजे इ.स.पू. ४०६/४०५) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी सॉफोक्लीस हा कालानुक्रमे दुसरा लेखक होता (एशिलसनंतरचायुरिपिडसच्या आधीचा). त्याने अंदाजे १२३ शोकांतिका लिहिल्या युरिपिडिस व सोफोक्लीस यांमध्ये सॉफोक्लीस अधिक लोकप्रिय होता, असे दिसते. धार्मिक उत्सवातील सर्वाधिक नाट्यस्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. त्याने पौराणिक नायकांना असामान्य परिस्थितीतले सामान्य नायक म्हणून रंगवले आणि नाटकांत वास्तववाद आणला. त्याच्या नाटकांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत.

सॉफोक्लीसचे 'ओडिपस रेक्स' हे नाटक ‘आदिपश्य’ या नावाने पु.ल. देशपांडे यांनी मराठीत आणले.


बाह्य दुवे[संपादन]

  • "सॉफोक्लीस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)