विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रँकफर्ट विमानतळ

विमानतळ(विमानाचा थांबा)(फ्रेंच:Aéroport, जर्मन:Flughafen, स्पॅनिश:Aeropuerto, इंग्लिश:Airport मराठीत उच्चार व लिखाण- एअरपोर्ट) :एक दळणवळणाचे स्थान/ठिकाण किंवा निश्चित मानव नियंत्रीत ठिकाण जे विमान उड्डाणाकरीता (निर्गमन) व उतरविण्याकरीता (आगमन) वापरले जाते. विमानाने आकाशात भरारी मारण्यासाठी व उतरण्यासाठी ज्या विशेष तांत्रिक सोयीसुविधा आवश्यक असतात त्या एका व्यावसायिक विमानतळावर उपलब्ध असतात. मोठी विमानतळे प्रवाशांच्या आगमन व निर्गमनाकरीता तसेच सामान व मालाच्या वाहतूकीकरता देखील वापरली जातात.मोठ्या विमानतळांवर विमानांच्या निर्वहन,बिघाड-दुरुस्तीइंधन भरण्याची सोय अशा अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केलेल्या असतात.

विमानतळावर विमान-उड्डाणासाठी व उतरविण्यासाठी आवश्यक असा सुयोग्य रस्ता आखलेला असतो त्यास धावपट्टी असे संबोधतात.हि धावपट्टी त्या त्या विमानतळाच्या वाहतू़क व वापरावर आधारीत लांबीची तसेच आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुनिश्चित केलेली असते.जगातील पहिले नागरी विमानतळ अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील न्युजर्सी राज्यातील नेवार्क (Newark)या ठिकाणी बांधल्या गेले.

जगातील सर्वात वर्दळीचे विमानतळ[संपादन]

२०१४ साली जगातील खालील विमानतळांनी सर्वाधिक प्रवाशांची वाहतूक केली.

क्रम विमानतळ स्थान देश कोड
(IATA/ICAO)
एकूण
प्रवासी
क्रम
बदल
%
बदल
1. अमेरिका हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ अटलांटा, जॉर्जिया अमेरिका ATL/KATL 96,199,400 1.8%
2. चीन बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ बीजिंग चीन PEK/ZBAA 84,004,178 1.4%
3. युनायटेड किंग्डम लंडन-हीथ्रो हिलिंग्डन, लंडन युनायटेड किंग्डम LHR/EGLL 73,371,195 1.4%
4. जपान हानेडा विमानतळ टोकियो जपान HND/RJTT 71,639,669 5.6%
5. अमेरिका लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया अमेरिका LAX/KLAX 70,622,212 1 6.3%
6. संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुबई संयुक्त अरब अमिराती DXB/OMDB 70,475,636 1 6.2%
7. अमेरिका ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ शिकागो, इलिनॉय अमेरिका ORD/KORD 70,075,204 2 4.2%
8. फ्रान्स चार्ल्स दि गॉल विमानतळ पॅरिस, इल-दा-फ्रान्स फ्रान्स CDG/LFPG 63,813,756 2.8%
9. अमेरिका डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ, टेक्सास अमेरिका DFW/KDFW 63,522,823 5.5%
10. हाँग काँग हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ हाँग काँग चीन HKG/VHHH 63,418,000 1 5.8%
11. जर्मनी फ्रांकफुर्ट विमानतळ फ्रांकफुर्ट, हेसेन जर्मनी FRA/EDDF 59,566,132 1 2.6%
12. तुर्कस्तान इस्तंबूल अतातुर्क विमानतळ इस्तंबूल Turkey IST/LTBA 56,954,790 6 11.1%
13. इंडोनेशिया सुकर्णो-हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ जाकार्ता, बांतेन इंडोनेशिया CGK/WIII 57,493,243 3 5.3%
14. चीन क्वांगचौ बैयुन आंतरराष्ट्रीय विमानतळ क्वांगचौ, क्वांगतोंग चीन CAN/ZGGG 56,050,262 2 4.1%
15. नेदरलँड्स ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल ॲम्स्टरडॅम, नूर्द-हॉलंड नेदरलँड्स AMS/EHAM 54,978,023 1 4.6%
16. सिंगापूर सिंगापूर चांगी विमानतळ चांगी सिंगापूर SIN/WSSS 54,093,070 3 0.7%
17. अमेरिका डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ डेन्व्हर, कॉलोराडो अमेरिका DEN/KDEN 53,528,960 2 3%
18. अमेरिका जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ क्वीन्स, न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क अमेरिका JFK/KJFK 53,254,362 1 5.2%
19. चीन शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ शांघाय चीन PVG/ZSPD 51,661,800 2 7.6%
20. मलेशिया क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ क्वालालंपूर, सलांगोर मलेशिया KUL/WMKK 48,918,988 3.0%
21. अमेरिका शार्लट-डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ शार्लट, नॉर्थ कॅरोलिना अमेरिका CLT/KCLT 47,258,910 1 2.4%
22. अमेरिका सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ सॅन फ्रान्सिस्को अमेरिका SFO/KSFO 47,074,162 5.4%
23. थायलंड सुवर्णभूमी विमानतळ बँकॉक थायलंड BKK/VTBS 46,423,352 6 5.7%
24. दक्षिण कोरिया इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ इंचॉन दक्षिण कोरिया ICN/RKSI 45,518,710 1 9.7%
25. अमेरिका मॅककॅरान आंतरराष्ट्रीय विमानतळ लास व्हेगास, नेव्हाडा अमेरिका LAS/KLAS 42,869,517 1 2.4%
26. स्पेन माद्रिद–बाराहास विमानतळ माद्रिद स्पेन MAD/LEMD 41,833,374 3 5.3%
27. अमेरिका जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ ह्युस्टन, टेक्सास अमेरिका IAH/KIAH 41,251,015 1 2.6%
28. अमेरिका मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ मायामी, फ्लोरिडा अमेरिका MIA/KMIA 40,941,879 2 0.9%
29. अमेरिका फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ फीनिक्स, ॲरिझोना अमेरिका PHX/KPHX 40,318,451 2 3.9%
30. जर्मनी म्युनिक विमानतळ म्युनिक जर्मनी MUC/EDDM 39,700,515 2.7%