नाना पाटेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाना पाटेकर
जन्म विश्वनाथ दिनकरराव पाटेकर
१ जानेवारी, १९५१ (1951-01-01) (वय: ७३)
मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, नाटके)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९७८ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके पुरुष
प्रमुख चित्रपट मराठी: पक पक पका‌क्‌
हिंदी: प्रहार, अब तक छप्पन (हिंदी चित्रपट)
वडील दिनकर पाटेकर
आई संजना पाटेकर
पत्नी नीलकांती पाटेकर
अपत्ये मल्हार पाटेकर

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर (१ जानेवारी, १९५१; मुरुड-जंजिरा - हयात) हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदीमराठी चित्रपटांत व नाटकांत भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे.[ संदर्भ हवा ]

नाना पाटेकर हा आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्लेला त्या धडपडीतून सावरून शिकून उभा राहिलेला असा एक अभिनेता आहे. जगाची व जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट नव्हे तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा नटसम्राट आहे.[ संदर्भ हवा ]

ओळख[संपादन]

नाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला.[ संदर्भ हवा ] नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले.[ संदर्भ हवा ] अतिशय गरीब परिस्थिती

कारकीर्द[संपादन]

नाना पाटेकर यांनी ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही.[ संदर्भ हवा ]

राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले, पण चित्रपट पडला.[ संदर्भ हवा ]

नानाची पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.[ संदर्भ हवा ]

१९८७ मध्ये आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती.[ संदर्भ हवा ]

१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला.[ संदर्भ हवा ]

२०१४ मधील 'प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.[ संदर्भ हवा ]

नाटके आणि त्यांतील भूमिका[ संदर्भ हवा ][संपादन]

  • पुरुष (गुलाबराव)
  • हमीदाबाईची कोठी (सत्तार)

चित्रपट [ संदर्भ हवा ][संपादन]

क्रमांक वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा पात्राचे नाव अधिक माहिती
१९८६ अंकुश
१९८६ माफीचा साक्षीदार
१९९२ अंगार
१९९६ अग्निसाक्षी
१९८७ अंधा युद्ध
२००५ अपहरण तबरेज आलम
२००५ अब तक छप्पन इन्स्पेक्टर साधू आगाशे
अभय
१९८७ अवाम
२००३ ऑंच
१९८४ आज की आवाज
२००९ इट्स माय लाइफ
१९९९ कोहराम : द एक्सप्लोजन
१९९४ क्रांतिवीर
१९९६ खामोशी : द म्यूझिकल
२००० गैंग
१९७८ गमन वासू
१९८४ गिद्ध : द व्हल्चर
१९९७ गु़लाम-ए-मुस्तफ़ा
२००६ टैक्सी नम्बर ९२११
२००३ डरना मना है
२००० तरकीब
१९९२ तिरंगा
१९८८ त्रिशाग्नी
१९९० थोडसा रूमानी हो जाएॅं
द अटॅक ऑफ २६/११
१९८६ दहलीज़
१९९० दिशा
१९९१ दीक्षा
२०११ देऊळ मराठी
२०१५ नटसम्राट मराठी
२००५ पक पक पकाक मराठी
१९८९ परिंदा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, फिल्मफेर पुरस्कार
२०१४ डॉ. प्रकाश बाबा आमटे मराठी
१९८७ प्रतिघात
१९९१ प्रहार : द फायनल अटॅक
२००५ ब्लफ़ मास्टर
भालू
२००३ भूत
१९८७ मोहरे
१९९७ यशवंत यशवंत
१९९८ युगपुरुष: अ मॅन हू कम्स जस्ट वन्स इन् अ वे
राजनीति
१९९२ राजू बन गया जंटलमन
१९९८ वजूद
२००२ वध
२००७ वेलकम
वेलकम बॅक
२००२ शक्ति : द पॉवर
शेला
१९८८ सलाम बॉम्बे
१९८८ सागर संगम
१९८७ सूत्रधार
२००७ हॅटट्रिक
१९९५ हम दोनों
१९९९ हुतूतू
२०१६ नटसम्राट

पुरस्कार [ संदर्भ हवा ][संपादन]

वर्ष (इ.स.) पुरस्कार भूमिका चित्रपट
१९९० फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परिंदा
१९९२ फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अंगार
१९९५ फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
१९९५ राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
१९९५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रांतिवीर
२००५ फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण
२००५ स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्कृष्ट खलनायक अपहरण
२०१३ पद्मश्री पुरस्कार[१]
२०१६ गोदावरी गौरव पुरस्कार चित्रपटक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल

दिग्दर्शक[संपादन]

नाना पाटेकर यांनी प्रहार:द फायनल अटॅक (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे.[ संदर्भ हवा ]

दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.[ संदर्भ हवा ]

सामाजिक कार्य[संपादन]

नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात.[२]

नाना पाटेकर यांच्यावरील पुस्तक[ संदर्भ हवा ][संपादन]

  • तुमचा आमचा नाना (लेखसंकलक श्रीकांत गद्रे) : या प्रकाशनाधीन पुस्तकात एन. चंद्रा, ना. धों. मनोहर, सुनील गावसकर, डॉ. रवी कसबेकर, रीमा, मंगेश तेंडुलकर, मोहन आगाशे, एन. चंद्रा, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, किशारी अमोणकर, सुभाष अवचट, रवींद्र साठे, अरविंद जगताप, विश्वजित शिंदे, डॉ. विकास आमटे, सुधीर गाडगीळ आदी ३५-४० लेखकांचे नानांविषक लेख आहेत. (प्रकाशन: फेब्रुवारी २०१७)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ गृह मंत्रालय, भारत सरकार. "Padma Awards Announced" (इंग्रजी भाषेत). ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन", महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र

बाह्य दुवे[संपादन]