आर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन (जन्म - इ.स. १८६६ , मृत्यू - २१ डिसेंबर, १९०९) हा ब्रिटिश भारतातील एक प्रशासकीय अधिकारी होता. संस्कृत भाषेचा जाणकार असलेला जॅक्सन हा भारतीय इतिहास, संस्कृती व देशी लोककथा यांचा अभ्यासक होता. त्याचे भारतीय इतिहासावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले होते. त्याने कोंकण, गुजरात या भागातील लोककथा संकलित करून त्यांची पुस्तके इंग्रजीत लिहिली होती.[१]

सन १९०९ च्या सुमारास जॅक्सन नाशिक येथील मॅजिस्ट्रेट म्हणून काम करत असताना दिनांक २१ डिसेंबर, १९०९ रोजी, नाशिक येथील विजयानंद नाट्यगृहात संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनंत कान्हेरे या तरुणाने त्याची गोळ्या झाडून हत्या केली. जॅक्सनच्या खुनासाठी अनंत कान्हेरे यास फाशीची तर विनायक दामोदर सावरकर यांना त्या खुनाच्या कटामागील मुख्य प्रेरकशक्ती म्हणून आजन्म कारावास व संपत्तीची जप्ती अशी शिक्षा ठोठावण्यात आली.[२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "इंटरनेट आर्काइव्ह्जवर जॅक्सन यांची पुस्तके". 2009-09-25 रोजी पाहिले.
  2. ^ "मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जॅक्सन खून खटल्याचा अहवाल". 2012-09-25 रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]