सदस्य:Uday Kulkarni

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार, माझ्या सदस्य पानावर आपले स्वागत आहे. विकिपीडिया शी मी गेल्या अनेक वर्षांपासून परिचित आहे. माझे खाते हे मी २००८ मध्ये बनविले. परंतु त्या आधीपासूनच मी विकिपीडिया वर विविध माहिती बघण्यासाठी येत होतो. मला जे माहिती नाही ते जाणून घ्यायला आणि जे माहिती आहे ते सांगायला खूप आवडते. त्यामुळे मला विकिपीडिया या मोफत ज्ञानकोशाची संकल्पना खूप आवडली. २००८ पासून खाते तयार केले असूनही माझे योगदान हे फार कमी आहे. कारण इतर कामात व्यस्त असल्याने मला आतापर्यंत जास्त वेळ देता आला नाही. तरीही मी आता अधून मधून विकिपीडिया ला भेट देत आहे व अलीकडील बदल या पानावरून सद्य सुरु असलेले बदल व नवीन तयार करण्यात आलेली पाने यात काही योगदान मला देता येत असेल तर मी देण्याचा प्रयत्न यापुढे करणार आहे. तसेच याच पानावरून काही नवीन लेख निर्माण करण्याची आवश्यकता वाटत असेल आणि मला त्याबद्दल माहिती असेल तर तेही मी अधून मधून करत जाईल. धन्यवाद!