ॲस्पेन, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲस्पेन शहर आणि स्की उतार

ॲस्पेन (लेखनभेद:आस्पेन) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर व स्की रिझॉर्ट आहे. हे शहर पिटकिन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २००५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,८०४ होती.[१]

या भागात मुबलक प्रमाणात असलेल्या ॲस्पेन झाडांमुळे या गावाचे नाव ॲस्पेन ठेवले गेले. पूर्वी चांदीच्या खाणी असलेल्या या शहराची गणना आता जगातील सगळ्यात महागड्या स्की रिझॉर्टमध्ये होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. कॉलोराडोतील वस्त्यांच्या लोकसंख्येचे अंदाज (इंग्रजी मजकूर).