१९९३ लातूर भूकंप
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
१९९३ लातूर भूकंप ३० सप्टेंबर १९९३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:५५ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत झाला. ह्या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर होते. रिश्टर स्केलवर ६.५ पातळीवर मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे १०,००० लोक मृत्यूमुखी पडले तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले व ५३,००० घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. ह्या दोन तालुक्यांतील एकुण ५२ गावे उध्वस्त झाली.