ह्युलेट-पॅकार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्युलेट-पॅकार्ड कंपनी
Hewlett-Packard Company
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र संगणक उत्पादक
स्थापना १९३९
पालो आल्टो, कॅलिफोर्निया
संस्थापक बिल ह्युलेट व डेव्हिड पॅकार्ड
मुख्यालय पालो आल्टो, कॅलिफोर्निया, Flag of the United States अमेरिका
महसूली उत्पन्न ११८.३६ अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
१०.४७३ अब्ज डॉलर्स
कर्मचारी ३,२५,०००
संकेतस्थळ हेव्लेट-पॅकार्ड.कॉम

ह्युलेट-पॅकार्ड कंपनी (किंवा एच.पी.) ही एक संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. आजच्या घडीला डेस्कटॉप व लॅपटॉपचे उत्पादन व विक्रीमध्ये एच.पी.चा जगात पहिला क्रमांक आहे. एच.पी. मुख्यालय कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅलीमधील पालो आल्टो ह्या शहरात आहे. बिल ह्युलेट व डेव्हिड पॅकार्ड ह्या दोघांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर पालो आल्टोतील एका गॅरेजमध्ये ५३८ डॉलर्स एवढ्या भांडवलावर एच.पी. ची १९३९ साली स्थापना केली..