होर्मुझची सामुद्रधुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होर्मुझची सामुद्रधुनी
वाहतूक मार्ग

होर्मुझची सामुद्रधुनी (फारसी: تنگه هرمز, अरबी: مَضيق هُرمُز) ही आशियाच्या मध्य पूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी आहे. इराणच्या आखाताला अरबी समुद्रहिंदी महासागरासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी स्थानांपैकी एक आहे. हिच्या उत्तरेस इराण तर दक्षिणेस संयुक्त अरब अमिरातीओमान हे देश आहेत. जगातील एकूण खनिज तेल वाहतूकीच्या २० टक्के वाहतूक ह्या सामुद्रधुनीद्वारे होते व येथील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी शिस्तबद्ध मार्ग आखून देण्यात आले आहेत.

ह्या सामुद्रधुनीच्या इराणजवळील स्थानामुळे अनेकदा इराण व अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ जुलै १९८८ रोजी अमेरिकन नौसेनेने २९० प्रवासी असलेले इराण एर फ्लाइट ६५५ हे विमान चुकीने पाडले होते.