हैदराबाद पोलिस कारवाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हैदराबाद पोलिस कारवाई
दिनांक सप्टेंबर १३, १९४७सप्टेंबर १८, १९४७
ठिकाण हैदराबाद राज्य सीमा
परिणती भारताचा विजय, हैदराबाद राज्य भारतात विलीन
युद्धमान पक्ष
भारत हैदराबाद राज्य
बळी आणि नुकसान
सैनिक: ३२ मृत
शेकडो जखमी
१,८६३
शेकडो जखमी

भारतीयहैदराबाद मुक्तिसंग्रातील हैदराबाद पोलिस कारवाई तथा ऑपरेशन पोलो ही भारतीय सैन्याने सप्टेंबर १९४८मध्ये हैदराबाद राज्याविरुद्ध केलेल्या हालचाली व त्यानंतरच्या घटना होत्या. या कारवाईद्वारे भारताने हैदराबाद राज्य स्वतःत विलीन करून घेतले.

पार्श्वभूमी[संपादन]

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची स्वातंत्र्य आंदोलनाची भूमिका केवळ परकीय राजवटीस घालवण्याचीच नव्हती तर भारतातील राजे राजवटींच्या एवजी सर्वसामान्यांची लोकशाही स्थापन व्हावी अशी भूमिका होती या भूमिकेतून स्वतंत्र भारत राज्यातून सरंजामशाहीचा अंत झाला पाहिजे अशा हेतूने स्वतंत्र भारतात संस्थानिकांचे विलिनीकरणाची काँग्रेसची असधिकृत भूमिका होती,या भूमिकेचे अजून एक कारण भारतीय इतिहासात उपमहाद्विपातील असंख्य राजे ते सरंजामशही संस्थानिक यांच्यातील संघर्षाचा परकीय आक्रमकांना फायदा मिळत गेल्याच्या इतिहासाची पुर्नावृत्ती होऊ नये असेही होते.स्वतंत्र भारताच्या रचने नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानांशी बोलणीकरून विलीन करून घेतले

हैदराबादचे संस्थान हैदराबाद राज्य ब्रिटीश राजवटीच्या अस्ताच्या वेळी पर्यंत टिकुन असलेले केवळ सर्वात मोठे स्वायत्त संस्थानिक राज्यच नव्हते तर उत्तर आणि दक्षीण भारताच्या मधोमध पसरले होते.त्याचे स्वतंत्र राहणे भारताच्या एकसंघतेस कमकुवत ठरवणारे होते.पण त्याही पलिकडे हैदराबाद संस्थानातील जनता स्वतःच्या चळवळी आणि आंदोलनांना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचाच एजक भाग समजत आली होती

तत्कालीन निजामाने सरदार वल्लभाईंच्या सामिलीनीकरण प्रस्तावांची केवळ अवहेलनाच केली नाहीतर हैदराबाद राज्यातील जनतेने चालविलेल्या लोकशाहीच्या मागणीच्या तसेच भरतीय संघराज्यात सामील होण्याकरिता चालविलेल्या जन आंदोलनास चिरडण्याकरिता तत्कालीन निजामाने रजाकार नावाच्या अमानुष संघेटनेकरवी अनन्वित अत्याचारांचा कळस गाठला गेलेला होता.हे अत्याचार एवढे अनन्वित होते की हैदराबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली.[ संदर्भ हवा ]. या पार्स्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन पोलो' अंतर्गत तत्कालीन हैदराबाद राज्य सामिल करून घेतले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.