हिंदुस्तानी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदुस्तानी
हिन्दुस्तानी • ہندوستانی
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश दक्षिण आशिया
लोकसंख्या ४९ कोटी (२००६)
बोलीभाषा खडीबोली, दक्खनी, कौरवी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी देवनागरी, फारसी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत (हिंदीउर्दू)
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान (उर्दू)
भाषा संकेत
ISO ६३९-१ hi, ur
ISO ६३९-२ hin, urd
ISO ६३९-३ hin - हिंदी
urd - उर्दू

हिंदुस्तानी किंवा हिंदी-उर्दू ही उत्तर भारतपाकिस्तान देशांमधील एक प्रमुख भाषा आहे. ह्या भाषेची दोन आधुनिक रूपे आहेत: हिंदीउर्दू. ह्या दोन्ही भाषा हिंदुस्तानीवरूनच तयार झाल्या असल्या तरीही त्यांचे व्याकरण, शैली, लिप्या इत्यादी वेगवेगळे आहे. उर्दूवर फारसीअरबी भाषांचा तर हिंदीवर संस्कृतचा प्रभाव पडला आहे. भारताच्या फाळणीअगोदर हिंदुस्तानी, हिंदी व उर्दू ह्या सर्व एकच होत्या.