हापूस आंबा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हापूस ही एक आंब्याची जात आहे. अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला हापूस हे नाव मिळाले.
हापूस त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे.हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील रत्नागिरी देवगड व गुजरातमधील वलसाड, नवसारी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.
हापूस पासून आंबापोळी आंबावडी आमरस इत्यादी पदार्थ बनवले जातात.