हरिप्रसाद चौरसिया
| हरिप्रसाद चौरसिया | |
हरिप्रसाद चौरसिया (इ.स. २०१०) |
|
| जन्म | १ जुलै, इ.स. १९३८ अलाहाबाद, उत्तरप्रदेश |
| कार्यक्षेत्र | बासरीवादन |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | हिंदी |
| पुरस्कार | संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९८४), पद्मभूषण (इ.स. १९९२), पद्मविभूषण (इ.स. २०००) |
| पत्नी | अनुराधा |
| अपत्ये | राजीव |
| अधिकृत संकेतस्थळ | http://hariprasadchaurasia.com/ |
पंडित हरिप्रसाद चौरसिया (जुलै १, इ.स. १९३८; अलाहाबाद, उत्तर प्रदेश; भारत - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९९२ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
अनुक्रमणिका |
[संपादन] जीवन
चौरसियांचा जन्म १ जुलै, इ.स. १९३८ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने कुस्तीपटू होते आणि हरिप्रसाद यांनीही कुस्तीतच नावलौकिक मिळवावा अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु संगीताची आवड असलेल्या हरिप्रसादांनी वडिलांच्या नकळत संगीताचा अभ्यास आरंभला. मित्राच्या घरी संगीतशिक्षणाचा सराव करणारे हरिप्रसाद काही काळ तालमीसाठी वडिलांसोबत आखाड्यात जात राहिले. बासरीवादनासाठी उपयुक्त ठरणार्या आपल्या दमसासाचे श्रेय ते लहानपणी केलेल्या कुस्तीच्या तालमीला देतात [ संदर्भ हवा ].
[संपादन] सांगीतिक कारकिर्द
वयाच्या पंधराव्या वर्षापासून चौरसियांनी त्यांच्या घराजवळ राहणार्या पंडित राजारामांकडून हिंदुस्तानी गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी वाराणसीच्या पंडित भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला.
[संपादन] पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार - 1984
- कोणार्क सम्मान - 1992
- पद्म भुषण - 1992
- यश भारती सन्मान - 1994
- पद्म विभुषण - 2000
- हाफिज अली खान सन्मान - 2000
- दिनानाथ मंगेशकर पुरस्कार - 2000
- Pune Pandit Award - 2008, by The Art & Music Foundation, Pune, India
- National Eminence award, NADA VIDYA BHARTI by Visakha Music and Dance Academy, Vizag - 2009
[संपादन] बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |