हबीब जालिब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


हबीब जालिब (उर्दू : حبیب جالب) हे पाकिस्तानी क्रांतिकारक कवी होते. ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ता व कट्टर प्रजासत्ताकवादी राजनेता होते. त्यांनी लष्करी कायदा, अधिनायकवाद व राजकीय दडपशाहीचा कडाडून विरोध केला.

प्राथमिक जीवन[संपादन]

हबीब जालिब २४ मार्च, १९२८ रोजी ब्रिटिश भारतातील होशियारपूरजवळच्या एका गावात जन्मले, व त्यांचे नाव "हबीब अहमद" ठेवण्यात आले. भारताच्या फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानमध्ये स्थलांतर केले. त्यावेळी ते कराचीमधील दैनिक इमरोज़ेच्या कार्यालयात प्रूफरीडर म्हणून काम करत. ते पुरोगामी लेखक होते. त्यांचे उत्साहवर्धक काव्यगायन ऐकायला बरेच श्रोते जमत. साधी शैली अंगीकारून, ते सोप्या भाषेत लिखाण करायचे, व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायचे. सभांमध्ये प्रेक्षकांच्यात अस्वस्थता निर्माण करण्यात यशस्वी होण्यामागे त्यांच्या सामाजिक व राजनैतिक जाणीवा, त्यांच्या शब्दांतली तळमळ, त्यांच्या आवाजातले संगीत व त्यांची भावनिक ऊर्जा ह्यांची सांगड जबाबदार होती.